Marathi News> विश्व
Advertisement

जर्मनीत सापडली 3000 वर्षे जुनी तलवार; इतिहासात दडलेली अनेक रहस्य उलगडणार

जर्मनीत 3000 वर्षे जुनी अत्यंत दुर्मिळ तलवार सापडली आहे. हजारो वर्षानंतर देखील ही तलवार अत्यंत सुस्थितीत आहे. या तलवारीला साधा गंज देखील लागलेला नाही. ही तलवार पाहून वैज्ञानिक देखील अचंबित झाले आहेत. 

जर्मनीत सापडली 3000 वर्षे जुनी तलवार; इतिहासात दडलेली अनेक रहस्य उलगडणार

Rare Sword: जर्मनीत 3000 वर्षे जुनी तलवार सापडली आहे. या तलावारीमुळे इतिहासात दडलेली अनेक रहस्य उलगडणार आहेत.  ही एक दुर्मिळ तलवार आहे. ही तलवार कांस्य युगातील असल्याचा दावा  पुरातत्वशास्त्रज्ञांनी केला आहे. विशेष म्हणजे या तलवारीची चमक आजही काय आहे. यावरची धुळ झटकल्यावर तलवार अगदी नव्या सारखी दिसत आहे. 

डेलीमेलने याबाबतचे वृत्त दिले आहे. ज्या ठिकाणी ही तलावर सपाडले तेथे तिन मृतदेह देखील सापडले आहेत. यातील एक मृतदेह महिलेचा, एक मृतदेह पुरुषाचा तर, एक मृतदेह हा अल्पवयीन तरुणाचा आहे. जेथे या तिघांचे दफन करण्याक आले होते तेथेच ही तलावर सापडली आहे. या तिघांचे एकमेकांशी काही संबध होते का? हे कोणत्या समुदयाशी निगडीत आहेत याबाबत संशोधन सुरु असल्याचे प्रिजर्वेशन ऑफ मॉन्यूमेंट्सचे प्रमुख  मेथियस फेल यांनी सांगितले. या तलवारीबाबत अधिक महिती उपलब्ध झाल्यास या मृतदेहांचे रहस्य उगलडण्यास देखील मदत होईल असा दावा केला जात आहे. 

तलवारीबाबत आश्चर्यकारक खुलासा

ही तलवार 3000 वर्षे जुनी असल्याचा दावा केला जात आहे. मृतदेहांसोबत ही तलवार येथे दफन करण्यात आली. मात्र, इतक्या वर्षानंतर देखील या तलावारीला गंज लागलेला नाही. या तलवाराची चमक आजही काय आहे. ही तलवारीवर चढलेली धूळ झटकल्यावर ही तलवार एकदम चकचकीत दिसू लागली. या तलवारीवर असलेले कोरीवकाम देखील अगदी स्पष्टपणे दिसत आहे. या तलावारीच्या मुठीवर झिग-झॅग पॅटर्नचे डिझाईन आहे. इतक्या वर्षांनतर देखील ही तलवार जशीच्या तशी एकदम चकचकीत कशी काय राहिली  असा प्रश्न संशोधकांना पडला आहे. या तलवारीचा आकार आणि याची भारदस्त ठेवण पाहता हे खूप धारधार शस्त्र असावे तसेच याचा वापर युद्धामध्ये केला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

युरोपियन देशांमध्ये तलवारींची खरेदी विक्री

युरोपातील काही देश अशा तलवारींच्या खरेदीसाठी हॉटस्पॉट असायचे असा अंदाज देखील तज्ज्ञ वर्तवत आहेत. प्रामुख्याने दक्षिण जर्मनी आणि डेन्मार्क या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात तलावारींची खरेदी विक्री होत असे. ही तलवार नॉर्डलिंगेनची आहे. जेथे ही तलवार सापडली तेथील पुराव्यांवरुन अनेक नव नवीन माहिती समोर येत आहे. उदाहरणार्थ, कांस्य युगातील अंत्यसंस्काराची पद्धत  म्हणून दफनविधी वेळी असा प्रकारच्या तलावरी ठेवल्या जात असाव्यात असेही बोलले जात आहे. 

Read More