Marathi News> विश्व
Advertisement

160,00,000 KM अंतराळातून पृथ्वीवर आला पहिला लेझर संदेश; एलियनशी संपर्क होणार?

 160,00,000 KM अंतराळातून पृथ्वीवर आला पहिला लेझर संदेश आला आहे. भविष्यातील मोहिमांसाठी हा संदेश दिशादर्शक ठरणार आहे. 

160,00,000 KM अंतराळातून पृथ्वीवर आला पहिला लेझर संदेश; एलियनशी संपर्क होणार?

Earth Receives First Laser Message: मानव सातत्याने एलियनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच एक मोठी घडामोड घडली आहे. 160,00,000 KM अंतराळातून पृथ्वीवर आला पहिला लेझर संदेश आला आहे. यामुळे संशोधक चकित झाले आहेत. या लेझर मेसेजचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

पृथ्वीपासून 16 दशलक्ष किमीपेक्षा जास्त अंतरावरून हा संदेश आला आहे. नासाच्या म्हणण्यानुसार हे अंतर पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतरापेक्षा 40 पट जास्त आहे. नासाच्या सायकी स्पेसक्राफ्टवरील डीप स्पेस ऑप्टिकल कम्युनिकेशन्स (डीएसओसी) या उपकरणाने हा संदेश पाठवला आहे. 13 ऑक्टोबर रोजी फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरमधून नासाच्या सायकी स्पेसक्राफ्टने उड्डाण केले.

50 सेकंदात पृथ्वीवर मेसेज आला

4 नोव्हेंबर रोजी सायकी स्पेसक्राफ्टने कॅलिफोर्नियातील पालोमार वेधशाळेत हेल टेलिस्कोपशी संपर्क साधला. सायकी स्पेसक्राफ्ट मधून हा संदेश पृथ्वीवर पोहोचण्यास सुमारे 50 सेकंद इतका वेळ लागला. या स्पेस क्राफ्टने पाठवलेला लेझर संदेश हा या मोहहिमेतील मोठे यश असल्याचे नासा जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीचे डीएसओसी प्रोजेक्ट टेक्नॉलॉजिस्ट अबी बिस्वास म्हणाले. या तंत्रज्ञानाच्या मदतीने  भविष्यात इतर ग्रहांवरील वैज्ञानिक माहिती, फोटो आणि व्हिडीओ उपलब्ध होवू शकतात असा विश्वास या मिशनवर काम करणाऱ्या संशोधकांनी व्यक्त केला आहे. 

काय आहे नासाचे सायकी मिशन?

फ्लोरिडा येथील  केनेडी स्पेस सेंटरमधून 13 ऑक्टोबर रोजी सायकी स्पेसक्राफ्ट  प्रक्षेपित करण्यात आले.  या प्रयोगासाठी डीप स्पेस ऑप्टिकल कम्युनिकेशन्स (डीएसओसी) प्रणालीचा वापर करण्यात आला. या तंत्रज्ञाच्या मदतीने खोल अंतराळात संपर्क साधणे शक्य होणार आहे. खोल अंतराळात अंतराळ यानाशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी पृथ्वीवर मोठे अँटेना बसवण्या आले आहेत. रेडिओ सिग्नलच्या मदतीने या अँटेनामधून संदेश पाठवला आणि प्राप्त केला जातो. या तंत्रज्ञानाच्या मदतीने सध्या वापरात असलेल्या अंतराळ संप्रेषण उपकरणांपेक्षा 10 ते 100 पट वेगाने माहिती पाठवू शकतो. 14 नोव्हेंबर रोजी सायकी स्पेसक्राफ्टने कॅलिफोर्नियातील पालोमार वेधशाळेत हेल टेलिस्कोपला लेझर संदेश पाठवत संपर्क साधला. 

 

Read More