Marathi News> महिला
Advertisement

ऑफिससाठी '5' प्रेझेन्टेबल साड्यांंचे प्रकार

  ऑफिस कल्चरमध्ये आपल्याला "वेस्टर्न" आणि "इंडियन" फॉर्मल ड्रेसिंग पाहावयास मिळते. पण आता बघायला गेलं तर वेस्टर्नपेक्षा इंडियन अटायरलादेखील जास्त पसंती मिळत आहे. साडी हा सर्व मुलींचा "वीक पॉईंट" आहे.

ऑफिससाठी '5' प्रेझेन्टेबल साड्यांंचे प्रकार

मुंबई :  ऑफिस कल्चरमध्ये आपल्याला "वेस्टर्न" आणि "इंडियन" फॉर्मल ड्रेसिंग पाहावयास मिळते. पण आता बघायला गेलं तर वेस्टर्नपेक्षा इंडियन अटायरलादेखील जास्त पसंती मिळत आहे. साडी हा सर्व मुलींचा "वीक पॉईंट" आहे.

वेगवेगळ्या कारणांसाठी, प्रसंगानुसार मुली सर्वात पहिले साडीलाच प्राधान्य देतात. ऑफिस कल्चर मध्येही हळू हळू साडी "इन" होताना दिसत आहे. साडी कल्चरमध्ये "लिवा"चं नाव सर्वात आधी घेतलं जातं, तर "लिवा" मार्फत तयार होणाऱ्या आणि ऑफिस कल्चरमध्ये "देसी साडी लूक "साठी चर्चेत असलेल्या काही हटके स्टाईल्सचा घेतलेला हा आढावा... 

हॅपनिंग हॅण्डलूम :

हॅन्डलूम साड्यांवरील नक्षीकामावरून आपल्याला भारतीय कलासंस्कृतीचे दर्शन घडते. या साड्या हाताने विणलेल्या असतात आणि म्हणूनच त्या दिसताना खूप आकर्षक वाटतात. या साड्या आपल्याला हव्या त्या डिझाईन्सने, रंगाच्या विणून घेऊ शकता, जसे की पाना-वेलींचे नक्षीकाम, वारली नक्षीकाम, किंवा आपल्याला हवे असेलेले नाव अशा अनेक डिझाईन्स सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.

शिफॉन पॅटर्न :

fallbacks

सर्वात नाजूक आणि मोहक साड्यांच्या प्रकारामध्ये शिफॉन साड्या अग्रस्थानी आहेत. अनेक मुली शिफॉन पॅटर्न वजनाला हलके आणि विविध रंगांची सांगड या साड्यांमध्ये असल्या कारणाने मुली या साड्यांना पसंती देतात. शिफॉन साडी आणि त्यावर हलकासा मेकअप करणाऱ्या मुली ऑफिस मध्ये खास आकर्षण ठरतात.

सिम्पली सिल्क :

fallbacks

रेशमी साड्या या प्रत्येक वयोगटातील स्त्रीला उठून दिसतात. ऑफिसमध्ये अशीच सिल्क साडी कोणी नेसली तर त्या मुलीची हमखास कोण ना कोणीतरी तारीफ करतंच ! रेशमी साड्यातून स्त्रीचं सौंदर्य अधिकचं खुलतं. एखाद्या कॉर्पोरेट मिटिंगमध्ये आपण जर सिल्क साडी नेसून गेलो तर त्या साडीतही आपण "प्रेझेंटेबल" दिसू.  

कुल कॉटर्न :

fallbacks

प्रत्येकाला आपल्या "कम्फर्ट झोन" मध्ये राहायला आवडतं. कॉटन हा "ऑल टाइम बेस्ट" मानला जाणारा पॅटर्न आहे. हलक्या प्रिंटची कॉटन साडी आपल्याला एक वेगळा लूक देऊन जातो. कॉटन साडीवर जंक ज्वेलरी आणि साजेसा मेकअप आपल्याला सर्वांपेक्षा "कुल लूक" देतो. फिक्या रंगाच्या कॉटन साड्या हादेखील उत्तम पर्याय आहे.

लिनन ट्विस्ट :

fallbacks

लिनन पॅटर्न हा ऑफिस गोइंग मुलींसाठी सर्वात कंफर्टेबल असा ऑप्शन आहे. साध्या तागापासून बनवलेल्या या साड्या आपला ऑफिस लूक अधिक आकर्षक बनवतात. या साड्यांवर आपण वेगवेगळे डिझाईनर ब्लाऊज परिधान करण्याचे प्रयोगदेखील करू शकतो. कारण लिनन साडी असा पॅटर्न आहे, जे आपण कोणत्याही ओकेजनवर अगदी बिनधास्तपणे परिधान करू शकतो.

वेस्टर्न ऑफिस लूक मध्ये आपल्याकडे फक्त दोन ते तीन एवढेच ऑप्शन आहेत पण इंडियन ड्रेसिंग स्टाईल मध्ये आपल्याला साड्यांचे विविध प्रकार मिळू शकतात, जे आपला ऑफिस लूक सर्वात हटके बनवण्यात आपली मदत करेल.

Read More