Marathi News> महिला
Advertisement

पहिल्यांदा बाळाला दूध पाजताय? या 3 पोझिशन्समुळे स्तनपान करणं होईल सोपं

स्तनपान हा एक महत्त्वाचा भाग आहे. स्तनपान करताना महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

पहिल्यांदा बाळाला दूध पाजताय? या 3 पोझिशन्समुळे स्तनपान करणं होईल सोपं

मुंबई : आई झाल्यानंतर महिलेवर अनेक मोठ्या जबाबदाऱ्या येतात. यावेळी बाळाला सुरक्षित आणि योग्य पद्धतीने आहार देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. स्तनपान हा एक महत्त्वाचा भाग आहे. स्तनपान करताना महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशावेळी स्तनपानाची योग्य स्थिती आई आणि नवजात दोघांसाठी आवश्यक आहे. स्तनपानाच्या विविध पोझिशन्स आहेत ज्यामधून आई निवडू शकते. 

जाणून घेऊया ब्रेस्टफिडींगच्या पोझिशन्स

क्रॉसओवर होल्ड

या स्थितीत, आपल्याला ब्रेस्टच्या विरुद्ध हात वापरायचा आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, जर तुम्ही उजव्या स्तनाने दूध पाजत असाल तर बाळाला डाव्या हाताने धरा. आता, तुमचे पाय क्रॉस करून बाळाला मांडीमध्ये धरा. शरीर थोडेसं वाकवा जेणेकरून बाळाला दूध पिण्यास सोप होईल.

रिक्लाइंड पोझिशन

स्तनपानाच्या या स्थितीचा प्रयत्न करण्यासाठी, बाळाला आपल्या पोटावर ठेवा. बाळाच्या डोक्याजवळ असलेल्या हाताने बाळाची पाठ धरा. या स्थितीत ठेवल्यास बाळाचे तोंड आपोआप तुमच्या स्तनासमोर येईल.

साईड लाइंग पोझिशन

जेव्हा तुम्ही आणि बाळ दोघेही एकमेकांना तोंड करून बेडवर झोपलेले असता तेव्हा साईड लाइंग स्थिती फायद्याची ठरते. ही सर्वात आरामदायक स्थितींपैकी एक आहे. बाळाचं तोंड तुमच्या स्तनांच्या जवळ असल्याची खात्री करा. तुमचा अंगठा आणि तर्जनी वापरून तुम्ही बाळाला दूध पाजू शकता.

Read More