Marathi News> महिला
Advertisement

गरोदर महिलांनी या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये

गरोदरपणात दिसून येणाऱ्या लक्षणांना समजून घेणं आवश्यक आहे.

गरोदर महिलांनी या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये

मुंबई : प्रत्येक महिलेसाठी गरोदरपणाचा काळ आनंदी असतो. या अवस्थेत, महिलांच्या शरीरात असे बरेच बदल होतात. अनेकदा हे बदल योग्य की अयोग्य हे ठरवणं देखील कठीण होतं. परंतु प्रत्येक लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने मोठी समस्या उद्भवण्याची शक्यता असते. यासाठी गरोदरपणात दिसून येणाऱ्या लक्षणांना समजून घेणं आवश्यक आहे. जेणेकरून ते कोणत्याही अडचणीचं कारण बनणार नाही.

गरोदर महिलांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये

  • गर्भधारणे दरम्यान बाळाच्या हालचालीकडे विशेष लक्ष द्यावं. जर गर्भाशयात बाळाची हालचाल कमी किंवा मंदावलेली जाणवली तर त्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका
  • गर्भधारणा झाल्यावर रक्तस्त्राव झाल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. गर्भधारणेदरम्यान लैंगिक संबंधानंतर  रक्तस्त्राव होऊ शकतो. परंतु सामान्य वेळी ही चिंताजनक असू शकतं.
  • गर्भधारणेदरम्यान सतत डोकेदुखी देखील एक गंभीर लक्षण ठरू शकतं. जर औषध घेतल्यानंतरही डोकेदुखी थांबत नसेल किंवा दृष्टी धुसर झाली तर डॉक्टरांशी संपर्क साधा.
  • गरोदर असताना पायांमध्ये सूज येणं देखील सामान्य आहे. परंतु जास्त सूज येणं हे धोक्याचं लक्षण असू शकतं. त्याचप्रमाणे चेहऱ्यावर किंवा डोळ्याभोवती सूज येणंही गंभीर असू शकतं.
  • गर्भधारणेदरम्यान वजन वाढणंही देखील सामान्य आहे. परंतु जर वजनात अधिक फरक दिसत असेल म्हणजे वजन जलद वाढणं किंवा कमी होणं तर ते सामान्य लक्षण नाही.
  • जरी हात, पाय, तळवे किंवा पायांच्या तळांवर वारंवार खाज सुटत असेल तर स्थिती त्याकडे लक्ष द्यावं.
  • लघवी करताना वेदना किंवा जळजळ होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्याचप्रमाणे लघवीला जर तीव्र दुर्गंध येत असेल तर हे इन्फेक्शनचं लक्षण असू शकतं.
  • गर्भधारणेदरम्यान ताप आल्यास स्वतःच्या मनाने औषध घेऊ नये
Read More