Marathi News> पश्चिम महाराष्ट्र
Advertisement

शिवसेना काँग्रेसच्या दबावाखाली वावरतेय- रामदास आठवले

शिवसेनेने विचारधारा सोडून काँग्रेसशी युती केली आहे. त्यामुळे या युतीची माती होईल.

शिवसेना काँग्रेसच्या दबावाखाली वावरतेय- रामदास आठवले

तुषार तपासे, झी मीडिया, सातारा: राज्यात सरकार चालवताना शिवसेना ही काँग्रेसच्या दबावाखाली वावरत असल्याची टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली. ते सोमवारी साताऱ्यातील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, शिवसेनेने विचारधारा सोडून काँग्रेसशी युती केली आहे. त्यामुळे या युतीची माती होईल. हे सरकार फार काळ टिकणार नाही, असे आठवले यांनी म्हटले. 

यावेळी रामदास आठवले यांनी ठाकरे सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयावरही सडकून टीका केली. महाविकासआघाडीकडून दिली जाणारी कर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचे त्यांनी म्हटले. 

'ईडी' मागे लावली त्यांना सन्मानाने आमंत्रण आणि आम्हाला.... राजू शेट्टी संतापले

यापूर्वीही रामदास आठवले यांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होईल, असे भाकीत वर्तविले होते. महाराष्ट्रात येत्या दोन महिन्यात नक्कीच काहीतरी मोठे पाहायला मिळेल. यापूर्वी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी भूकंप केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंचा भूकंप झाला. आता कोणाचा भूकंप होणार, हे लवकरच समजेल. मात्र, कोणता ना कोणता भूकंप नक्की होणार, असे रामदास आठवले यांनी म्हटले होते. 

दरम्यान, आज विधिमंडळाच्या प्रांगणात महाविकासआघाडीच्या विस्तारीत मंत्रिमंडळचा शपथविधी पार पडला. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून महाविकासआघाडीच्या ३६ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.

राज्यपालांच्या चमत्कारिक वागण्यावर महाविकासआघाडीचे नेते नाराज

Read More