Marathi News> पश्चिम महाराष्ट्र
Advertisement

दादांनी करुन दाखवलं; माळेगाव साखर कारखान्यावर पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता

या निवडणुकीनंतर शरद पवारांना सन्मानाने कारखान्यात आणू, असा शब्द अजित पवारांनी दिला होता.

दादांनी करुन दाखवलं; माळेगाव साखर कारखान्यावर पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता

बारामती: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत नीळकंठेश्वर पॅनलने २१ पैकी १७ जागांवर विजय मिळवला. तर सहकार शेतकरी बचाव सहकारी पॅनलला अवघ्या चार जागांवरच समाधान मानावे लागले. २०१५ साली झालेल्या निवडणुकीत शरद पवारांचे एकेकाळचे निष्ठावंत असणार्‍या चंदरराव तावरे यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का दिला होता. यंदाच्या निवडणुकीत अजित पवार यांनी त्याचा वचपा काढला.

माळेगाव हा शरद पवार यांचा कारखाना म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या कारखान्याचा राज्यात नावलौकिक आहे. आतापर्यंत सन १९९७ आणि २०१५ च्या निवडणुका वगळता या कारखान्यावर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहीले होते. मात्र, गेल्या निवडणुकीपूर्वी केंद्र आणि राज्यातली सत्ता गेल्यानंतर माळेगाव कारखानाही राष्ट्रवादीच्या हातून गेला होता.

त्यामुळे गेल्या पाच वर्षांत शरद पवार कारखान्यात गेले नव्हते. मात्र, या निवडणुकीनंतर शरद पवारांना सन्मानाने कारखान्यात आणू, असा शब्द अजित पवारांनी दिला होता. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती. अजित पवारा यांनी या निवडणुकीसाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. अखेर निवडणुकीत नीलकंठेश्वर पॅनेलने बाजी मारल्याने माळेगाव सहकारी साखर कारखान्यात पुन्हा राष्ट्रवादीचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.

मतमोजणी झालेल्या २१ जागांवरील विजयी उमेदवार

गट नंबर १ (माळेगांव)

* संजय काटे- राष्ट्रवादी
* बाळासाहेब भाऊ तावरे- राष्ट्रवादी
* रंजन काका तावरे- सहकार बचाव

गट नंबर २ (पणदरे)

* तानाजी कोकरे- राष्ट्रवादी
* केशवराव जगताप- राष्ट्रवादी
* योगेश जगताप- राष्ट्रवादी

गट नंबर ३ (सांगवी)
* सुरेश खलाटे- राष्ट्रवादी
* अनिल तावरे - राष्ट्रवादी
* चंद्रराव तावरे- सहकार बचाव


गट नंबर ४ (निरावागज)

* मदनराव देवकाते- राष्ट्रवादी
* बन्सीलाल आटोळे- राष्ट्रवादी
* प्रताप आटोळे- सहकार बचाव

गट नंबर ५ (बारामती)

* नितीन सातव- राष्ट्रवादी
* राजेंद्र ढवाण- राष्ट्रवादी
* गुलाबराव गावडे- सहकार बचाव

ब वर्ग

* स्वप्नील जगताप - राष्ट्रवादी

महिला प्रतिनिधी
*  सौ. संगीता कोकरे - राष्ट्रवादी
*  सौ. अलका पोंदकुले - राष्ट्रवादी

भविजा प्रवर्ग
* तानाजी देवकाते (राष्ट्रवादी)

इतर मागास प्रवर्ग
* सागर जाधव (राष्ट्रवादी)

अनु. जाती प्रवर्ग
* दत्तात्रय भोसले (राष्ट्रवादी)

Read More