Marathi News> पश्चिम महाराष्ट्र
Advertisement

डीजे नाही तर विसर्जन नाही; पुण्यातील गणेश मंडळांचा आक्रमक पवित्रा

सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्याबाबत दाखवलेली दिरंगाई अन्यायकारक आहे.

डीजे नाही तर विसर्जन नाही; पुण्यातील गणेश मंडळांचा आक्रमक पवित्रा

पुणे: गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे वाजवण्यावर घालण्यात आलेल्या बंदीविरोधात पुण्यातील गणेश मंडळांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. विसर्जन मिरवणुकीतील डीजे-डॉल्बीवरील बंदी सरकारनं तात्काळ हटवावी. अन्यथा आम्ही गणेशमुर्तींचे विसर्जन करणार नाही, अशा इशारा या मंडळांनी दिला आहे. त्यामुळे आता सरकार यावर काय तोडगा काढणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्याबाबत दाखवलेली दिरंगाई अन्यायकारक आहे. डॉल्बी व्यावसायीकांचा तर या निर्णयाला विरोध आहेच. आता गणेश मंडळांनीही या निर्णयाविरोधात प्रखर विरोधांचे हत्यार उगारले आहे. पुण्यातील १०० ते १५० मंडळांनी एकत्र येत हा निर्णय घेतलाय. डॉल्बीवरील बंदी हटविण्यासाठी सरकारला आज संध्याकाळपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. 

Read More