रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी20 वर्ल्ड कप 2024 वर नाव कोरलं. तब्बल सतरा वर्षानंतर टीम इंडियाने दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपचं जेतेपद पटकावलं.

वेस्ट इंडिजच्या भूमीवर ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या टीम इंडियावर पैशांची बरसात झाली. विजेत्या टीम इडियाला तब्बल 20 कोटी 36 लाखांची प्राईज मनी मिळाली.

पण तुम्हाला माहित आहे का 1983 म्हणजे 41 वर्षांपूर्वी पहिला वर्ल्ड जिंकणाऱ्या टीम इंडियाला किती रुपयांचं बक्षीस मिळालं होतं.

गेल्या 41 वर्षात विजेत्या संघाला मिळणाऱ्या प्राईज मनीत मोठा फरक पडला आहे. कपिल देवच्या संघ आणि रोहित शर्माच्या संघाला मिळालेल्या बक्षीसात हजार पटीने वाढ झाली आहे.

कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 1983 ला पहिल्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलं. त्यावेळी आयसीसीकडून विजेत्या टीम इंडियाला 9.93 लाखांचं बक्षीस मिळालं होतं.

त्यावेळी संघातील प्रत्येक खेळाडूला दिवसाचे 500 रुपये फी आणि खाण्या-पिण्यासाठी आणि कपडे धुण्याचा भत्त म्हणून 200 रुपये दिले जात होते.

1983 मध्ये भारती क्रिकेट संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एनकेपी साळवी यांनी खेळाडूंना प्रत्येकी 2 लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली होती.

पण बीसीसीआयकडे हे बक्षीस देण्यासाठी पैसेच नव्हते. त्यामुळे बीसीसीआयने लता मंगेशकर यांचा संगीताचा कार्यक्रम आयोजित करुन पैसे जमवले.

या संगीत कार्यक्रमात लता मंगेशकर यांनी कोणतंही मानधन घेतलं नाही. या कार्यक्रम मिळालेल्या पैशातून भारतीय खेळाडूंना प्रत्येकी 1 लाख रुपये देण्यात आले.

Read Next Story