अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. या स्टेडिअमवर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान विश्वचषकासाठीची अंतिम लढत खेळवली जात आहे.

विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित आहेत. देशाचे गृहमंत्री अमित शाह हा सामना पाहण्यासाठी आले आहेत.

याशिवाय बॉलिवूडमधले अनेक स्टार्स मोदी स्टेडिअमवर हजर आहेत. यात दीपिक पदुकोण, अनुष्का शर्मा, अथिया शेट्टी, शाहरुख खान, रणबीर सिंह टीम इंडियाला चिअर करताना दिसतायत.

तर विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा, तसंच केएल राहुलची पत्नी आणि अभिनेत्री अथिया शेट्टी एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहे.

तर विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा, तसंच केएल राहुलची पत्नी आणि अभिनेत्री अथिया शेट्टी एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहे.

याशिवाय किंग खान शाहरुखही गौरी खानसह हजर आहे. शाहरुखच्या बाजूलाच ज्येष्ठ गायिका आशा भोसलेही सामना पाहण्यासाठी बसलेल्या दिसतायत.

अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडिअम जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडिअमपैकी एक आहे. अंतिम सामना पाहण्यासाठी या स्टेडिअममध्ये जवळपास 132000 प्रेक्षक उपस्थित आहेत.

Read Next Story