घनदाट मजबूत केसांसाठी कोणती फळे खावी?

आजकाल लहानमुलांपाासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण केसगळतीच्या समस्येला त्रासले आहेत.जर तुम्हालासुद्धा तुमचे केस दाट करायचे आहेत तर आहारात 'या' फळांच सेवन नक्की करा.

किवी

किवीमध्ये मुबलक प्रमामात व्हिटॅमिन सी आणि अॅंटी-ऑक्सीडंट गुणधर्म असतात. किवीचे सेवन केल्याने शरीरात कोलेजनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. जे केसांना घट्ट आणि मजबूत बनवण्यास मदत करतात.

पेरू

पेरूमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि बी असतात. पेरूचे सेवन केल्याने केस मजबूत होतात आणि केस वाढण्यास मदत होते.

आवळा

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळतात.जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, केस मजबूत करते, दाट बनवते आणि केसांची वाढ करण्यास मदत करते.

अननस

अननसचे सेवन करणे देखील केसांसाठी फायदेशीर ठरते. अननस खाल्ल्याने केस दाट होतात.

अ‍ॅव्होकॅडो

अ‍ॅव्होकॅडोमध्ये व्हिटॅमिन ई , बायोटिन आणि हेल्दी फॅट्स भरपूर प्रमाणात आढळतात.या फळाचे सेवन केल्याने केस दाट होण्यास मदत होते.

केळी

केळीमध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम, कॅलशियम, फायबर आणि व्हिटॅमिन-ए सारखे पोषक तत्व आढळतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Read Next Story