वेश्याव्यवसाय भारतात कायदेशीर आहे का?

मोठमोठ्या शहरांच्या एखाद्या छोट्या गल्लीतर वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे आपण कधी ना कधी ऐकले असेल.

जिथे महिला स्वत:च्या शरिराचा सौदा करतात. कधी स्वेच्छेने तर कधी हतबल होऊन या व्यवसायात येतात.

काही लोकं वेश्याव्यवसाय करणाऱ्यांना नावे ठेवतात. यांच्यामुळे समाज बिघडतो असे म्हणतात.

पण भारतात वेश्याव्यवसाय कायदेशीर आहे का?

दलाली करणे आणि सार्वजनिक ठिकाणी ग्राहक शोधणे हा गुन्हा आहे.

एखाद्या महिलेने पैशासाठी तिचे शरीर दुसऱ्याच्या हाती दिले तर त्याला वेश्याव्यवसाय म्हटले जाते. पैशासाठी स्वैरपणे आपले शरीर दुसऱ्याच्या हाती सोपवणारी स्त्री वेश्या मानली जाते.

कोणत्याही ठिकाणी दोन किंवा अधिक लोकांनी मिळून वेश्याव्यवसाय केला तर ते वेश्यागृह मानले जाते. जर कोणी सार्वजनिक ठिकाणी वेश्याव्यवसाय करत असेल तर तो गुन्हा आहे.

सार्वजनिक ठिकाणी कोणी एखाद्याला संबंध ठेवण्यासाठी प्रवृत्त करत असेल किंवा पैसे घेत असेल तर तोही गुन्हा आहे.

वैश्यागमनाची खुली ऑफर देणे किंवा व्यवसायासाठी मागणी करणे हा गुन्हा आहे आणि त्यासाठी शिक्षेची तरतूद आहे. अशा प्रकारच्या वेश्याव्यवसायाला कायद्याने मान्यता दिलेली नाही.

Read Next Story