कुटुंबाला भेटून विराट कोहली भावूक, बहिण-भावासह फोटो केला शेअर

टी20 वर्ल्ड कप चॅम्पियन टीम इंडियाचं मायदेशात जल्लोषात स्वागत करण्यात आलं. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर टीम इंडिया ITC मौर्य हॉटेलमध्ये पोहोचली.

दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर टीम इंडियाच्या स्वागतासाठी ढोल-ताशे वाजवण्यात आले. यावेळी रोहित शर्मा, सूर्यकुमार आणि हार्दिक पांड्याने डान्सही केला.

यावेळी विराट कोहली मोठ्या कालावधीनंतर आपल्या कुटुंबाला भेटला. त्याच्या स्वागतासाठी बहिण भावना कोहली-ढिंगरा आणि भाऊ विकास कोहली उपस्थित होते.

भावना कोहली आणि विकास कोहली टीम इंडिया येण्याच्या आधीच आयटीसी मोर्य हॉटेलमध्ये उपस्थित होते.

यावेळी विराट कोहलीने मोठा भाऊ विकास कोहलीच्या गळ्यात आपलं वर्ल्ड कपचं मेडल घातलं. याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

टीम इंडियाने दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यावेळी पीए मोदी यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंशी मनसोक्त गप्पाही मारल्या.

टीम इंडियाने 29 जून 2024 ला दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं. या फॉर्मेटमध्ये टीम इंडिया दुसऱ्यांदा चॅम्पियन ठरली आहे.

Read Next Story