डायबिटीजसह 'या' आजारांवर लवंग म्हणजे रामबाण उपाय

लवंगीचा वापर प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सर्रास केला जातो.

औषधी गुणधर्म असल्यामुळे जेवणाची चव वाढवणारी ही लवंग आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.

यामध्ये असलेले पोषक तत्व अनेक आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात. लवंगीमध्ये फायबर, व्हिटॅमिन k आणि मँगनीज असते.

मँगनीज हे मेंदूला योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते. त्यामुळे हाडेही बळकट होतात.

लवंग अँटीऑक्सिडंटनं परिपूर्ण असल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास आणि शरीरातील बॅक्टेरिया नष्ट करण्यास मोठी मदत होते.

लवंगीमुळे यकृताचे आरोग्य निरोगी राहते. थायोएसीटामाइड हा विषारी पदार्थ यकृत खराब करते आणि लवंग हे विष काढून टाकते.

लवंग तेल कॅन्सरपासून रक्षण करते असाही दावा केला जातो. लवंगमधील युजेनॉलमध्ये कॅन्सरविरोधी गुणधर्म असतात.

3 ते 4 लवंग दुधात मिसळून ते पिण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. पण, जास्त प्रमाणात लवंग खाल्ल्याने आरोग्यासाठी धोकाही पोहोचू शकतो. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Read Next Story