Marathi News> विदर्भ
Advertisement

सरपण आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा धक्कादायकरित्या मृत्यू; कुटुंबियांना करावी लागली अंतयात्रेची तयारी

चंद्रपूर येथे वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला आहे.  या घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले होते. वाघाचा बंदोबस्त होईपर्यंत शव ताब्यात घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती.  

सरपण आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा धक्कादायकरित्या मृत्यू; कुटुंबियांना करावी लागली अंतयात्रेची तयारी
Updated: May 21, 2023, 12:06 AM IST

Gadchiroli News : सरपण आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा धक्कादायकरित्या मृत्यू झाला आहे. कुटुंबियांना या महिलेच्या अंतयात्रेची तयारी करावी लागली. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातल्या वाघोली- बुटी गावात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले होते. वाघाचा बंदोबस्त होईपर्यंत शव ताब्यात घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती.  

प्रेमीला रोहनकर असे आहे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर ग्रामस्थ संतापले आहेत. वाघाचा बंदोबस्त होईपर्यंत शव ताब्यात न घेण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली.  या क्षेत्राचे आमदार माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तातडीने घटनास्थळी जात ग्रामस्थांना दिलासा देणार असल्याचे घोषीत केले. वनविभागाने तात्काळ वाघाला ठार मारावे अन्यथा वाघ मृत आढळल्यास ग्रामस्थांना जबाबदार धरू नका असा दिला निर्वाणीचा इशारा दिला.  

जंगलात गेलेली महिला घरी परत आलीच नाही

प्रमिला सरपणासाठी गावालगतच्या जंगलात गेली असताना तिच्यावर वाघाने हल्ला केला. जंगलात गेलेली प्रेमिला रोहनकर घरी परत न आल्याने शोध चालविला असता तिचे शव आढळून आले. गेल्या पंधरा दिवसात वाघाच्या हल्ल्यात ग्रामस्थ ठार झाल्याची ही दुसरी घटना असून त्यामुळेच ग्रामस्थ संतापले आहेत. 

लोहखनिज वाहतुकीने घेतला शिक्षकाचा बळी

पाच दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथे एका 12 वर्षीय मुलीला चिरडणाऱ्या सूरजागड लोहखनिज वाहतुकीने पुन्हा एका शिक्षकाचा बळी घेतला आहे. वासुदेव कुळमेथे (४९ रा. गोमनी ) असे मृत शिक्षकाचे नाव असून हा अपघात आलापल्ली येथील बँक ऑफ महाराष्ट्र समोर घडला. या घटनेने नागरिकांमधे रोष व्यक्त करण्यात येत आहे. आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास काटेपल्ली येथील भगवंतराव आश्रम शाळेत शिक्षक असलेले वासुदेव कुळमेथे हे आपल्या दुचाकीने चंद्रपूर मार्गावरील बँक ऑफ महाराष्ट्र समोरून जात होते. दरम्यान, मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आलापल्ली येथील मुख्य चौकात घडल्याने ट्रकचालकाला नागरिकांनी पकडून ठेवले होते. सूरजागड येथून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने ते शहरातून देखील भरधाव जात असतात. त्यामुळे या मार्गावर कायम अपघाताचा धोका असतो. सूरजागड लोहखनिज वाहतूक आणखी किती बळी घेणार, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.