Marathi News> ठाणे
Advertisement

अर्धनग्न करुन धिंड काढली, नाक घासायला लावले आणि.... कल्याणमध्ये भर रस्त्यात तरुणाला शिक्षा

कल्याणमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. सोशल मिडिया पोस्टवरुन वाद झाला यानंतर अल्पवयीन तरुणाला भर रस्त्यात तालिबानी शिक्षा करण्यात आली. 

अर्धनग्न करुन धिंड काढली, नाक घासायला लावले आणि.... कल्याणमध्ये भर रस्त्यात तरुणाला शिक्षा

Kalyan Crime News : कल्याणमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. सोशल मीडियात धार्मिक भावना दुखावणारी वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला तालिबानी शिक्षा देण्यात आली आहे. भर रस्त्यात या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. अर्धनग्न करुन धिंड काढली, नाक घासायला लावले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

जमावानं बेदम मारहाण केली

कल्याणमध्ये जमावानं तरुणाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.  या मुलाला अर्धनग्न करून त्याची धिंड काढण्यात आली. या जमावानं त्या मुलाला रस्त्यावर नाक घासून माफी मागायला लावली.  याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 12 जणांना ताब्यात घेतलंय. कुणीही कायदा हातात घेऊ नये असं आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

नेमका काय आहे प्रकार?

कल्याणच्या वडवली अटाळीगांव, बारवे परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोशल मीडियावर एकमेकांच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या वादग्रस्त पोस्ट करून आक्षेपार्ह संदेश लिहण्यात आला होता. दरम्यान त्या पोस्ट डिलीट करण्याच्या वादातून एका अल्पवयीन तरुणाला अर्धनग्न करून त्याला २० ते २५ जणांचा जमावाने बेदम मारहाण केली आहे.

रस्त्यावर नाक घासायला लावून माफी मागायला सांगितली

या जमावाने तरुणाला बेदम मारहाण करत त्याला रस्त्यावर नाक घासायला लावून माफी मागायला सांगितली. हा सगळा संतापजनक व्हिडिओ अनेकांनी मोबाईलमध्ये चित्रित केला होता. त्या अनुसंघाने मारहाण करणाऱ्या 20 ते 25 जणांवर कल्याण खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यातील 12 जणांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे. 

या सगळ्या प्रकरणानंतर सोशल मीडियावर कोणीही आक्षेपार्य पोस्ट टाकू नये आणि जर कोणी असं करून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल तर संबंधितानी पोलीस स्टेशनची संपर्क साधावा असे अहवान पोलिसांनी केलं आहे.

विधवेला काळं फासत, चपलांचा हार घालत तिची धिंड काढली

नाशिक जिल्ह्यातून विधवेला काळं फासत, चपलांचा हार घालत तिची धिंड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. नाशिकच्या शिवरे इथे हा लाजिरवाणा प्रकार घडला होता. पीडित महिला माहेरी आली असताना पतीचं निधन झालं. पतीनं गळफास लावून आत्महत्या केली असं महिलेला सांगण्यात आलं. पण आपला पती आत्महत्या करुच शकत नाही, हा घातपात आहे असा संशय पत्नीनं व्यक्त केला. त्यानंतर दशक्रिया विधीदिवशीच महिलेला मारहाण करत तिची धिंड काढण्यात आली. या घटनेचे फोटो व्हायरल झाले, त्यानंतर वडनेर भैरव पोलिसांनी पीडितेची सुटका केली. अखेर पीडीत महिलेच्या जबाबानुसार वडनेर भैरव पोलीस ठाण्यात 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

Read More