Marathi News> ठाणे
Advertisement

सरकारमध्ये एकत्र असलेले सेना-राष्ट्रवादी आमने सामने, लसीकरण मोहिमेवरुन राडा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट महापौर दालनात धडक मारत राडा घातला

सरकारमध्ये एकत्र असलेले सेना-राष्ट्रवादी आमने सामने, लसीकरण मोहिमेवरुन राडा

ठाणे : महाविकास आघाडी सरकारमध्ये एकत्र असलेले शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) ठाणे महापालिकेत (Thane Municipal Corporation) मात्र आमने सामने आले. लसीकरण मोहिमेवरुन (Coroan Vaccination) या दोन पक्षांमध्ये आज राडा पाहिला मिळाला. राष्ट्रवादीने कळवा भागात आयोजित केलेल्या लसीकरण मोहिमेचे बॅनर्स सेनेच्या कार्यकर्त्यांनी फाडल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आपल्या वैयक्तिक खात्यातून दिलेला 20 लाख रुपयांचा धनादेश महापौर नरेश म्हस्के (TMC Mayor Naresh Mhaske) यांनी नाकारल्याने राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे (Anand Paranjpe) आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक महापौरांवर संतापले. त्यांनी थेट महापौर दालनात धडक मारत गोंधळ घातला. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. 

शिवसेना लसीकरणाबाबत नेहमीच राजकारण करुन लसीकरणाचे कार्यक्रम हाय जॅक करत असल्याचा राष्ट्रवादीने आरोप केला आहे. तर येणारी निवडणूक बघता राष्ट्रवादी स्टंटबाजी करत असल्याचा महापौर नरेश म्हस्के यांनी आरोप केला आहे.

Read More