Marathi News> टेक
Advertisement

स्मार्टफोन देणार भूकंपाच्या संकेताची माहिती; Googleकडून नव्या फिचरवर काम सुरु

गुगलकडून अशा टेक्नोलॉजीवर काम सुरु...

स्मार्टफोन देणार भूकंपाच्या संकेताची माहिती; Googleकडून नव्या फिचरवर काम सुरु

नवी दिल्ली : भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे दुर्दैवाने जगभरातील अनेक ठिकाणी वित्त, जिवित हानी होत असते. या नैसर्गिक आपत्तीदरम्यान लोकांचा जीव वाचवण्यासाठी कोणताही संभाव्य इशारा महत्त्वपूर्ण ठरु शकतो. अशाच प्रकारची एक सुविधा Google कडून देण्यात येणार आहे. अँन्ड्रॉईड स्मार्टफोन यूजर्ससाठी अशा प्रकारची एक सुविधा लवकरच सुरु होऊ शकते. गुगलकडून अशा टेक्नोलॉजीवर काम सुरु आहे, ज्याद्वारे स्मार्टफोन earthquake detectorचं काम करेल. म्हणजे भूकंप येण्याआधीच याबाबतचे संकेत मिळतील.

गुगलने मंगळवारी कॅलिफोर्नियामध्ये भूकंप अलर्ट सिस्टम (Earhquake Alert System) जोडलं आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, अँन्ड्रॉईड स्मार्टफोन (Smartphone) कंप्रेशर डिटेक्टर म्हणून काम करेल. भूकंपाचे अलर्ट पाठविण्यासाठी गुगलने युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) आणि कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर ऑफिस ऑफ इमर्जन्सी सर्व्हिसेससह  (Cal OES) सहकार्य केलं आहे. हे ShakeAlertद्वारे चालवलं जाईल, जे कॅलिफोर्निया राज्यात स्थापित केलेल्या 700 हून अधिक seismometer सिग्नलचा वापर करतं.

गूगलच्या मते, अँन्ड्रॉईड फोन मिनी seismometer असू शकतात, जे जगातील कोट्यवधी अँन्ड्रॉईड फोनमध्ये सामील होऊन जगातील सर्वात मोठं भूकंप शोध नेटवर्क तयार करु शकेल.

 

Read More