Marathi News> टेक
Advertisement

Amazon सोबत पार्ट टाईम किंवा फुल टाईम काम करा आणि वर्षाला 3 लाखांपर्यंत कमवा

यामध्ये चांगली गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला 8 ते 10 तास वाया घालवण्याची गरजही नाही. 

Amazon सोबत पार्ट टाईम किंवा फुल टाईम काम करा आणि वर्षाला 3 लाखांपर्यंत कमवा

मुंबई : जर तुम्ही  फुल टाईम किंवा पार्ट टाईम जॉबच्या शोधात असाल, तर लोकप्रिय ई-कॉमर्स कंपनी Amazon तुम्हाला चांगले पैसे कमवण्याची संधी देत ​​आहे. अ‍ॅमेझॉनने काही वर्षांपूर्वी भारतात आपली Flex सेवा आणली, ज्याद्वारे लोकं स्वतःला कंपनीचे डिलिव्हरी पार्टनर म्हणून नोंदणी करू शकतात आणि दररोज काही तास वेळ देऊन पैसे कमवू शकतात. भारतात अ‍ॅमेझॉन डिलिव्हरी पार्टनर म्हणून काम करून लोक वार्षिक 3 लाख रुपयांपर्यंत कमावू शकतात.

यामध्ये चांगली गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला 8 ते 10 तास वाया घालवण्याची गरजही नाही. तुम्हा 6 तास काम करुन देखील 25 हजार रुपये कमऊ शकता. परंतु अ‍ॅमेझॉन डिलिव्हरी पार्टनर कसे व्हावे? तुम्ही कसे पैसे कमावू शकता याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अ‍ॅमेझॉन डिलिव्हरी पार्टनर कसे व्हावे?

Amazon Flexने या कार्याशी संबंधित सर्व माहिती त्यांच्या अधिकृत वेबसाइटच्या FAQ पेजवर दिली आहे. परंतु आम्ही तुमच्यासाठी माहिती मिळवणे थोडं सोपी करत आहोत.

Amazon डीलिव्हरी पार्टनर होण्यासाठी, तुम्हाला आधी तुमची काही माहिती देऊन अ‍ॅमेझॉन फ्लेक्स अ‍ॅप डाउनलोड करणे आवश्यक आहे. या माहितीमध्ये तुमचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल पत्ता, तुमच्याकडे असलेल्या वाहनाचा प्रकार इत्यादी टाकावे लागेल.

त्यानंतर तुम्हाला अ‍ॅपवर स्वतःची नोंदणी करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे अ‍ॅमेझॉन खाते वापरून अ‍ॅपमध्ये लॉग इन करावे लागेल आणि तुमच्याकडे अ‍ॅमेझॉन खाते नसेल, तर तुम्ही तुमचे नवीन खाते तयार करू शकता.

यानंतर, बॅकग्राउंड चेक करण्यासाठी आपल्याला अ‍ॅपने विचारलेली माहिती योग्यरित्या प्रविष्ट करावी लागेल. यानंतर, तुम्हाला तुमचे सेवा क्षेत्र निवडावे लागेल, जिथे तुम्हाला डीलिव्हरी  सेवा द्यायची आहे. तुम्हाला कर कपात आणि पेमेंटची पावती यासाठी काही इतर माहिती देखील द्यावी लागेल.

अ‍ॅमेझॉन डीलिव्हरी  पार्टनर होण्यासाठी मला काय आवश्यक आहे?

सर्वप्रथम तुमचे वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त, आपल्याकडे एक अँड्रॉइड फोन असणे आवश्यक आहे, ज्यामध्ये किमान 2 जीबी रॅम असणे आवश्यक आहे. या फोनमध्ये फ्लॅशसह कॅमेरा, जीपीएस लोकेशन सेवा, व्हॉइस आणि डेटा कनेक्टिव्हिटीसह एक सक्रिय सिम कार्ड असणे आवश्यक आहे.

यानंतर दुसरी सर्वात महत्वाची गरज म्हणजे तुमच्याकडे वाहन असणे आवश्यक आहे. आपल्याकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स, आपल्या वाहनाचे वैध आरसी, वाहनाचे विमा प्रमाणपत्र आणि प्रदूषण प्रमाणपत्र (पीयूसी) असणे आवश्यक आहे. कर संबंधित दस्तऐवजांमध्ये वैध पॅन कार्ड आणि पेमेंटच्या पावतीसाठी बचत किंवा चालू खाते असणे आवश्यक आहे.

Amazon डीलिव्हरी पार्टनर किती कमावू शकतात?

अ‍ॅमेझॉन म्हणतो की, डीलिव्हरी  पार्टनर 120 ते 140 रुपये प्रति तास कमवू शकतो आणि दररोज जास्तीत जास्त 6 तास काम करू शकतो. यानुसार, तुम्ही दरमहा सरासरी 25 हजार रुपये आणि सरासरी 3 लाख रुपये वार्षिक कमवू शकता. 

जर तुम्ही हे काम अर्धवेळ म्हणून केले आणि दररोज जास्तीत जास्त 4 तास काम केले, तर तुम्ही सरासरी सुमारे 17हजार रुपये दरमहा आणि वार्षिक सरासरी 2 लाख रुपयांपर्यंत कमावू शकता.

अ‍ॅमेझॉनचे म्हणणे आहे की, डीलिव्हरी पार्टनरला या कमाईचा 1% कर म्हणून भरावा लागेल.

Read More