Marathi News> टेक
Advertisement

Google Map चं हे फीचर वापरा आणि स्वत:चा डिजिटल पत्ता तयार करा, कसं ते जाणून घ्या

तुमच्या पत्त्यावर दिलेला डिजिटल कोड क्रमांक हा प्रत्यक्ष पत्त्यापेक्षा पूर्णपणे वेगळा असतो.

Google Map चं हे फीचर वापरा आणि स्वत:चा डिजिटल पत्ता तयार करा, कसं ते जाणून घ्या

मुंबई : Google आपल्या वेगवेगळ्या ऍप्समध्ये दररोज नवनवीन वैशिष्ट्ये आणत आहे. यामुळे वापरकर्त्यांना ते ऑपरेट करणे सोयीचे होत आहे. गुगलने नुकतेच नवीन अपडेट आणले आहे. आता Google Maps मध्ये तुम्ही तुमच्या घराचा पत्ता 'प्लस कोड' सोबत सेव्ह आणि शेअर करू शकाल. या नवीन फीचरमुळे यूजर्स त्यांच्या घराचा डिजिटल पत्ता तयार करू शकतील. याचा फायदा असा होईल की, इतर कोणतीही व्यक्ती तुमच्या घरी सहज पोहोचू शकेल. तो कोड एखाद्या पिन कोडप्रमाणे काम करेल.

डिलिव्हरी करणाऱ्याला पत्ता सांगणे सोपे जाईल

तुमच्या पत्त्यावर दिलेला डिजिटल कोड क्रमांक हा प्रत्यक्ष पत्त्यापेक्षा पूर्णपणे वेगळा असेल. याद्वारे जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात तुमचं घर असू दे कोणताही डिलिव्हरी करणारा व्यक्ती या कोडचा वापर करुन तुमच्या घरी पोहोचू शकतो.

यामुळे कोणत्या खाना- खुणा किंवा व्हॉइस मेसेज शेअर न करता तुमचे अन्न, औषध किंवा पार्सल योग्य पत्यावर पोहचू शकेल. योग्य आणि एक्युरेट नेव्हिगेशनसाठी प्लस कोड असलेला पत्ता इतर लोकांशी देखील शेअर केला जाऊ शकतो. जसे की तुमचे मित्र, नातेवाईक यांना देखील तुम्ही फॉलो करु शकता.

गुगल मॅप तुम्हाला गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्यास मदत करू शकते. प्लस कोड हा एक विनामूल्य, मुक्त स्रोत डिजिटल पत्ता आहे, जो तुम्हाला अचूक स्थान शोधण्यात मदत करेल.

परंतु आता लोकांना हा प्रश्न पडला आहे की, हा कोड नक्की कसा तयार करायचा?

गुगल कोड कसा तयार करायचा?

ते जनरेट करण्यासाठी, ऍपमध्ये तुम्हाला होम लोकेशन सेव्ह करताना तुमचे सध्याचे लोकेशन वापरा असा पर्याय दाखवेल. प्लस कोड जनरेट करण्यासाठी ते तुमच्या फोनचे Current Location वापरेल. तुम्ही त्याला एकदा सेव्ह केल्यावर, तो प्लस कोडसह घराचा पत्ता थेट Google नकाशेवर जतन केलेल्या टॅबमधून सामायिक केला जाऊ शकतो.

Google Maps वर एखादे ठिकाण आधीच तुमचे घर म्हणून सेव्ह केले असल्यास, तुम्हाला अचूक तपशीलांसाठी प्लस कोड दिसेल.

Google Maps ने सुरुवातीला हे नवीन फीचर Android वापरकर्त्यांसाठी आणले आहे. मात्र, येत्या काही दिवसांत तो iOS वापरकर्त्यांसाठीही उपलब्ध होईल.

विशेष म्हणजे, 2015 मध्ये, Google ने जगभरातील 'हार्ड-टू-फाइंड' ठिकाणे शोधण्यासाठी उपाय म्हणून प्लस कोड्स सादर केले. हे तंत्रज्ञान भारतात मार्च 2018 मध्ये लाँच करण्यात आले.

Read More