Marathi News> टेक
Advertisement

Recharge Plan: पैसे 1 महिन्याचे घेतात मग रिचार्ज 28 दिवसांचा का? आज जाणून घ्या

Recharge Plan: सर्वात आधी काही मोजक्या कंपन्यांकडून 28 दिवसांचा प्लान दिला जायचा.

Recharge Plan: पैसे 1 महिन्याचे घेतात मग रिचार्ज 28 दिवसांचा का? आज जाणून घ्या

Recharge Plan: आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. प्रत्येक मोबाईल सुरु राहण्यासाठी लागत एखाद्या कंपनीचं सिमकार्ड आणि सिमकार्ड सुरु राहण्यासाठी लागतो रिचार्ज. आपल्याला दरमहिन्याला रिचार्जसाठी थोडे पैसै बाजुला काढून ठेवावेच लागतात. खपू महागडा स्मार्टफोन असेल पण त्यात  सिमकार्ड नसेल तर तो काही कामाचा नाही. आपला रिचार्ज प्लानसाठी 30 दिवसांचे पैसे घेतात पण रिचार्ज 28 दिवसांचा देतात. असं का होतं? विचार केलाय का?

सर्वात आधी काही मोजक्या कंपन्यांकडून 28 दिवसांचा प्लान दिला जायचा. पण आता सर्व कंपन्यांच्या रिचार्जची वॅलिडीटी सारखीच असते. कंपन्या ग्राहकांसोबत असे का करतात? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. 

पैसे 30 दिवसांचे मग रिचार्ज 28 दिवसांचा का?

वर्षाचे 12 महिने असतात. यात फेब्रुवारी 28 दिवसांचा, कोणता महिना 31 महिना तर कोणता महिना 30 दिवसांचा असतो. यामुळे ग्राहकांना 12 ऐवजी 13 महिन्यांचा रिचार्ज करावा लागतो. जर कंपनीने पूर्ण 30 दिवसांचा प्लान दिला तर त्यांचे यात नुकसान होते. 

युजर्सच्या प्रायव्हसीसाठी व्हॉट्सअ‍ॅप आणणार अनोखे फिचर

हे नुकसान वाचवण्यासाठी टेलिकॉम कंपन्या 30 दिवसांऐवजी 28 दिवसांचा रिचार्ज प्लान ऑफर करतात. असे केल्यास त्यांच्याकडे 2 ते 3 दिवस शिल्लक उरतात. यामागे टेलिकॉम कंपन्यांची हुशारी असते. 

 ग्राहकांना वर्षाला 12 ऐवजी 13 रिचार्ज 

टेलीकॉम कंपन्यांना 28 दिवसांच्या प्लान संदर्भात TRAI ने गाईडलाईन्स जाहीर केली होती. पण आतापर्यंत TRAI ने यावर कोणती अपडेट दिली नाही. त्यामुळे अद्यापही सर्व कंपन्यांचा मोबाईल रिचार्ज आधीप्रमाणे 28-28 दिवसांचा सुरु आहे. यामुळे ग्राहकांना वर्षाला 12 ऐवजी 13 रिचार्ज करावे लागतात.

दिवसभर मोबाईलमध्ये असता? भंगेल बाप बनायचे स्वप्न!

युट्यूब शॉर्ट्समधून पैसे कमावणं खूपचं सोपं! 'हा' क्रायटेरिया पूर्ण करुन व्हा श्रीमंत

Read More