Marathi News> टेक
Advertisement

YouTube वर पहिल्यांदा अपलोड झालेला व्हिडीओ कोणता? पाहून व्हाल आश्चर्यचकीत

सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात, परंतु त्यापैकी एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल.

YouTube वर पहिल्यांदा अपलोड झालेला व्हिडीओ कोणता? पाहून व्हाल आश्चर्यचकीत

मुंबई : YouTube चा आपण नेहमीच वापर करीत असतो. 15 वर्षांहून अधिक कालावधीत लाखो व्हिडिओ YouTube वर अपलोड केले गेले आहेत आणि जवळजवळ प्रत्येक प्रकारची सामग्री येथे आढळू शकते. कोणीही YouTube वर स्वतःचे खाते तयार करून व्हिडिओ शेअर करू शकतो. पण याची सुरुवात कशी झाली माहीत आहे का? यूट्यूबच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलने वेबसाइटवर अपलोड केलेला पहिला व्हिडिओ शेअर केला आहे. 

यूट्यूबवरील हा पहिला व्हिडिओ आहे, ज्यामध्ये यूट्यूबचे सह-संस्थापक जावेद करीम दिसत आहेत. 17 वर्षांपूर्वी अपलोड केलेल्या या 19 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये जावेद करीम सॅन डिएगो प्राणीसंग्रहालयात हत्तींच्या उभे आहेत. व्हिडिओमध्ये करीमला 'ठीक आहे, आम्ही हत्तींसमोर आहोत' असे म्हणताना ऐकू येत आहे.

विशेष म्हणजे त्यांच्या व्हेरिफाईड यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला हा एकमेव व्हिडिओ आहे. त्याला 235 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.

YouTube अधिकृतपणे 14 फेब्रुवारी 2005 रोजी लाँच करण्यात आले. ऑनलाइन व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म ही Google नंतर सर्वात जास्त भेट दिलेली दुसरी वेबसाइट आहे. YouTube चे 2.5 अब्ज मासिक वापरकर्ते आहेत, जे एकत्रितपणे दररोज एक अब्ज तासांहून अधिक व्हिडिओ पाहतात.

Read More