Marathi News> टेक
Advertisement

WhatsApp: व्हॉट्सअॅपचा दिवाळी धमाका! लवकरच येणार 5 जबरदस्त फिचर्स

whatsapp Update: दिवाळीच्या तोंडावर WhatsApp देखील आपल्या ग्राहकांना दिवाळी गिफ्ट देणार आहे.

WhatsApp: व्हॉट्सअॅपचा दिवाळी धमाका! लवकरच येणार 5 जबरदस्त फिचर्स

WhatsApp features: व्हॉट्सअॅप ही आता काळाची गरज बनली आहे असं म्हणायला हरकत नाही. आज प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप असतोच. व्हॉट्सअॅपमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. ऑफिस काम असो किंवा नातेवाईक, आष्टेमित्रांशी संपर्कात राहण्यासाठी सगळ्यात कामाचा हा अॅप आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप आपल्या ग्राहकांना अपडेट ठेवण्यासाठी त्यांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन features आणतं असतो. दिवाळीच्या () तोंडावर WhatsApp देखील आपल्या ग्राहकांना दिवाळी गिफ्ट देणार आहे.  (whatsapp new features 2022 nmp) 

जर तुम्हीही व्हॉट्सअॅप वापरकर्ते असाल आणि नवीन फीचर्सची वाट पाहत असाल तर आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअॅपच्या अशा 5 फीचर्सबद्दल सांगणार आहोत, जे लवकरच लॉन्च केले जाणार आहेत. 

ही आहेत नवीन फीचर्स

1. व्हॉट्सअॅप लवकरच आपल्या जुन्या फीचरमध्ये एक अपडेट सादर करत आहे, ज्यामुळे 1,024 सहभागींना ग्रुपमध्ये जोडता येईल (1,024 participants to be added to the group). असं सांगण्यात आलं आहे की व्हॉट्सअॅपने हे फीचर काही बीटा टेस्टर्ससाठी सादर केले आहे, जे Android आणि iOS दोन्ही वापरकर्त्यांसाठी आहे.

2. व्हॉट्सअॅप एका डॉक्युमेंट कॅप्शन फीचरवर काम करत आहे, जे वापरकर्त्यांना चॅटिंग करताना शेअर केलेल्या फायलींना कॅप्शन देऊ (allow users to quickly caption shared files while chatting) शकेल. व्हॉट्सअॅप अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही वापरकर्त्यांसाठी सतत बीटा-चाचणी करत आहे. या कॅप्शन फीचरचे खास वैशिष्ट्य म्हणजे या अंतर्गत यूजर्स सर्च ऑप्शनचा वापर करून चॅटमध्ये शेअर केलेले डॉक्युमेंट किंवा फाइल सहज शोधू शकतील.

3. व्हॉट्सअॅपने वापरकर्त्यांसाठी बीटामध्ये स्क्रीनशॉट ब्लॉकिंग (screenshot blocking) फीचर आणले आहे. स्क्रीन ब्लॉकिंग वैशिष्ट्याच्या मदतीने, वापरकर्ते एकदा पहा म्हणून पाठवलेले व्हिडिओ आणि फोटोंचे स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाहीत. स्क्रीनशॉट आणि स्क्रीन रेकॉर्डिंग थांबवून वापरकर्त्यांची गोपनीयता सुधारणे हा त्याचा उद्देश आहे.

4. WhatsApp ने काही व्यवसायांसाठी प्रीमियम सबस्क्रिप्शन योजना जारी करण्यास सुरुवात केली आहे. सध्या, त्याच्या किंमती उघड करणे बाकी आहे आणि वेगवेगळ्या प्रदेशांसाठी ते बदलू शकतात.

5. व्हॉट्सअॅप बीटा अपडेटमध्ये स्टेटसला रिप्लाय देण्यासाठी एक नवीन साइडबार आणि नवीन फीचर सादर करत आहे. स्टेटस या नवीन वैशिष्ट्यासह, लोकांना स्टेटसला स्वतंत्रपणे उत्तर देण्यासाठी एक बार  मिळेल. या व्यतिरिक्त, नवीन अपडेटमध्ये, काही वापरकर्त्यांनी हे देखील लक्षात घेतले आहे की मायक्रोसॉफ्ट स्टोअर वरून अपडेट करताना, त्यांना अॅप साइड बार (app side bar) देखील दिसत आहे, जिथे वापरकर्ते सहजपणे स्टेटस अपडेट, सेटिंग्ज आणि प्रोफाइल (status updates, settings and profiles) पाहू शकतील.

Read More