Marathi News> टेक
Advertisement

WhatsApp चं नवं फीचर, Notes आणि Documents सांभाळून ठेवता येणार

WhatsApp New Feature: व्हॉट्सअ‍ॅपनं भारतात नवं फीचर लाँच केलं आहे. या माध्यमातून तुम्ही स्वत:ला मेसेज करू शकता. WhatsApp वर अत्यावश्यक नोट्स, रिमाइंडर आणि अपडेट सेव्ह करणं सोपं होणार आहे. 

WhatsApp चं नवं फीचर, Notes आणि Documents सांभाळून ठेवता येणार

WhatsApp Manage Yourself: व्हॉट्सअ‍ॅप्स हे सर्वात लोकप्रिय अ‍ॅप आहे. स्मार्टफोन असलेल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये तुम्हाला हे सोशल मीडिया अ‍ॅप पाहायला मिळेल. लोकप्रियता पाहता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये नवनवे फीचर्स अपडेट होत आहेत. आता व्हॉट्सअ‍ॅप यूजर्स प्लॅटफॉर्मवर स्वत:ला मेसेज पाठवता येणार आहे. कंपनीने सोमवारी 'Message Yourself' नावाचं नवं फीचर सुरु केलं आहे. हे फीचर अत्यावश्यक अपडेटसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. कंपनीने सांगितल्यानुसार, हे फीचर्स स्वत:ला महत्त्वाच्या नोट्स, रिमाइंडर्स आणि अपडेट पाठवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या फीचरद्वारे तुम्ही To-Do लिस्ट, शॉपिंग लिस्ट, नोट्स इत्यादी सांभाळून ठेवू शकता. हे नवं फीचर अँड्रॉइड आणि आयफोनवर उपलब्ध असणार आहे. 

नवं फीचर्स कसं वापराल

  • WhatsApp सर्वात आधी अपडेट करा आणि अ‍ॅप्लिकेशल ओपन करा
  • नव्या चॅटमध्ये जा आणि कॉन्टॅक्ट लिस्टच्या टॉपवर क्लिक करा. तिथे तुमचा Contact नंबर दिसेल.
  • नंबरवर क्लिक करून तुम्ही स्वत:ला मेसेज पाठवू शकता.

बातमी वाचा- Gold Investment Plan: गोल्डमध्ये गुंतवणूक करायची आहे, जाणून घ्या संपूर्ण गणित

WhatsApp चे नवं फीचर्स

मेटा संस्थापक आणि सीईओ मार्क जुकरबर्ग यांनी व्हॉट्सअ‍ॅपसाठी नवे फीचर्स लाँच केले आहेत. यात 32 लोकांना एकत्र व्हिडीओ कॉलिंग, इन चॅट पोल आणि ग्रुप लिमिट 1024 व्यक्तींना समाविष्ट करता येणार आहे. या सोबतच Communities On WhatsApp नावाचं फीचर लाँच केलं आहे. 

व्हॉट्सअॅप डेस्कटॉप व्हर्जनसाठी कॉलिंग फीचरवर काम करत आहे. जर तुमच्याकडे लॅपटॉप सुरु असून फोनवर बोलण्याची गरज भासणार नाही. लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरूनही कॉल रिसिव्ह आणि बोलता येईले. हे फीचर्स सध्या बीटा आवृत्ती युजर्ससाठी उपलब्ध आहे. नॉन-बीटा यूजर्ससाठी लवकरच लाँच केलं जाईल. 

Read More