Marathi News> टेक
Advertisement

व्हॉट्सअॅपची 'आनंद पसरवा, अफवा नको' जाहिरात

खोट्या बातम्यांमुळे व्हॉट्सअॅप झालंय बदनाम

व्हॉट्सअॅपची 'आनंद पसरवा, अफवा नको' जाहिरात

सुस्मिता भदाणे. मुंबई : सोशल अॅप व्हॉट्सअॅप सध्या आनंद पसरवा, अफवा नको, अशी सातत्यानं जाहिरात करतं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खोट्या बातम्यांमुळे व्हॉट्सअॅप बदनाम झालं आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपने एक नवीन योजना आखली आहे. आनंद पसरवा, अफवा नको, अशी जाहिरात सध्या व्हॉट्सअॅपने सुरु केली आहे. सोशल मीडियावरुन अफवा पसरल्या की हिंसाचाराच्या घटना गेल्या काही काळांत ठिकठिकाणी घडल्या. केंद्र सरकारने याविषयी व्हॉटसअॅपला धारेवर धरल्यानंतर व्हॉट्सअॅपने ही जाहिरात करायला सुरूवात केली आहे. पण व्हॉटसअॅपनंही अॅपमध्ये सुधारणा करायला हवी, असं मत व्यक्त केलं जातं आहे.

आतापर्यंत फेसबूक, गूगल, ट्विटर या सोशल मीडिया साईटसना अशी जाहिरात करण्याची गरज पडली नाही. कारण यामध्ये कुठलीही बाब तुमच्या परवानगीशिवाय होत नाही. व्हॉटसअॅपवर तुमच्या परवानगीशिवाय तुम्हाला एखाद्या ग्रुपमध्ये जोडलं जाऊ शकतं. एखाद्या ग्रुपचा तुम्हाला अॅडमिन करण्यात येतं. याची साधी सूचनाही तुम्हाला येत नाही. अनेकांना तर गुन्हा दाखल झाल्यावर एखाद्या ग्रुपचे अॅडमिन होतो, याचा साक्षात्कार होतो.

व्हॉटसअॅपनं थोड्या सुधारणा करणं गरजेचं आहे. पण सोशल मीडिया वापरणाऱ्यांनीही एखादी पोस्ट फॉरवर्ड करताना तेवढंच भान ठेवणं आवश्यक आहे.

Read More