Marathi News> टेक
Advertisement

Jio ब्रॉडबँड यूजर्ससाठी महिन्याच्या प्लानपेक्षा आठवड्याचा 'हा' प्लान फायद्याचा

Reliance JioFiberने भारतात आपली ब्रॉडबँड सर्व्हिस सुरु केली आहे.

Jio ब्रॉडबँड यूजर्ससाठी महिन्याच्या प्लानपेक्षा आठवड्याचा 'हा' प्लान फायद्याचा

नवी दिल्ली : Reliance JioFiberने भारतात आपली ब्रॉडबँड सर्व्हिस सुरु केली आहे. कंपनी JioFiber ग्राहकांना ११७० रुपयांत ५TB डेटा ऑफर करत आहे. सध्या या प्लानची वैधता ३५ दिवस इतकी आहे. यापूर्वी कंपनीने   JioFiber यूजर्ससाठी १९९ रुपयांचा आठवड्याचा प्लान जाहीर केला होता. ज्यात यूजर्सला एका आठवड्यासाठी १TB डेटा ऑफर करत आहे.

JioFiber यूजर्स, १९९ रुपयांचा प्लान पाच वेळा रिचार्ज केल्यास त्याची टॅक्ससह रक्कम ११७० इतकी होते. ज्यात यूजर्सला पाच आठवड्यांसाठी ५TB डेटा मिळतो. १९९ रुपयांच्या आठवड्याच्या प्लानमध्ये यूजर्सला १००mbps स्पीड लिमिट मिळतो. 

३० दिवसांच्या प्लानबाबत विचार केल्यास, यूजर्सला टॅक्ससह १०५३ रुपये भरावे लागतात. ज्यात यूजरला ४.५TB डेटा मिळतो. १००mbps स्पीड लिमिट असणारा JioFiberचा १९९ रुपयांचा आठवड्याचा प्लान, महिन्याच्या प्लानपेक्षा चांगला आहे. 

JioFiber Gold planची किंमत एका महिन्यासाठी १२९९ रुपये + १८% GST आहे. ज्यात यूजरला एक महिन्यासाठी २५०Mbps स्पीड आणि ७५०GB डेटा मिळतो. 

१९९ रुपयाच्या आठवड्याच्या प्लानमध्ये यूजरला १००mbps स्पीड मिळतो. तर JioFiber Gold मध्ये यूजरला २५०mbps स्पीड मिळतो. 

Read More