Marathi News> टेक
Advertisement

WIFI चा वेग दुप्पट करायचाय? तर या ठिकाणी असला पाहिजे राऊटर

तुम्हाला असे वाटते का तुमच्या वायफाय राउटरची  (Router) स्पीड दुप्पट व्हावी. तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

WIFI चा वेग दुप्पट करायचाय? तर या ठिकाणी असला पाहिजे राऊटर

Wifi Router Position : भारतात अधिकतर लोक इंटरनेटसाठी  Wifi Router चा वापर करतात. यामुळे घरातले सगळ्या व्यक्ती एकाचवेळेस वायफायला जोडले जातात. वायफायमुळे फास्ट इंटरनेटचा (Internet) आनंद घेता येतो. लॉकडाउनच्या

दरम्यान Wifi Router चे कनेक्शन घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली कारण बरेचसे लोक कोरोनाकाळात घरुन काम करु लागले. पण बऱ्याचदा वायफायचा वेग कमी झाल्याचे देखील दिसते. कारण एकाच वेळेस बरेचजण वायफायला जॉईन करतात आणि

त्यामुळे देखील वायफायची वेग कमी होतो. यामागे बरीच कारणे आहेत पण आज आम्ही तुम्हाला एक अशी पद्धत सांगणार आहोत की ज्यामुळे वायफायचा वेग कमी होण्याची अडचण दूर होईल. तुम्हाला असे वाटते का तुमच्या वायफाय राउटरची 

(Router) स्पीड दुप्पट व्हावी. तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. 

आणखी वाचा... Interesting News : हिटलरच्या नाकावर टिच्चून काम करणाऱ्या 'या' भारतीय वंशाच्या महिला गुप्तहेर कोण, माहितीये?

जागा बदलून वायफायची स्पीड वाढेल

जर तुम्हाला इंटरनेटचा वेग वाढवायचा असेल तर वायफायची  (Wifi) जागा बदलून वेग वाढु शकतो. तुम्हाला याविषयी माहित नसेल तर आम्ही सांगतो जागा बदलल्याने वायफायचा वेग दुप्पट वाढतो. एक अशी जागा आहे ज्या ठिकाणी वायफाय

ठेवल्यावर  इंटरनेटची कनेक्टिविटी जास्त प्रमाणात वाढते. 

मोकळ्या जागेत वायफाय लावा

जर तुम्ही वायफाय मोकळ्या जागेत जसं की हॉल किंवा व्हरांड्यात लावता तर तुमच्या वायफायची (Wifi)स्पीड दुप्पट वाढते. कारण मोकळ्या जागेमुळे प्रत्येक रुममध्ये इंटरनेटची Speed बरोबर पोहचते. मग आपल्याला याचा विचार करायची गरज नाही

लागत कोणत्या कोपऱ्यात इंटरनेट खूप चांगला चालेल. मोकळ्या जागेतच राउटर लावला पाहिजे ज्यामुळे वायफायच्या चांगल्या वेगाचा सगळ्यानांच आनंद घेता येईल.

Read More