Marathi News> टेक
Advertisement

Video: भारतात तयार केलेल्या 'या' कारला मिळाले 5 स्टार सेफ्टी रेटिंग, जाणून घ्या किंमत

Volkswagen Virtus Safety Rating: कार विकत घेताना त्याचे सेफ्टी फीचर्सही महत्त्वाचे असतात. कारण यामुळे एखाद्या अपघातात जीव वाचण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे गाड्यांची टेस्ट घेऊन सुरक्षा फीचर्सबाबत सांगितलं जातं. नुकतंच मेड इन इंडिया फोक्सवॅगन व्हर्टूसला लॅटीन एनसीएपी टेस्टमध्ये 5 स्टार सुरक्षा रेटिंग प्रदान करण्यात आली आहे.

Video: भारतात तयार केलेल्या 'या' कारला मिळाले 5 स्टार सेफ्टी रेटिंग, जाणून घ्या किंमत

Volkswagen Virtus Safety Rating: कार विकत घेताना त्याचे सेफ्टी फीचर्सही महत्त्वाचे असतात. कारण यामुळे एखाद्या अपघातात जीव वाचण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे गाड्यांची टेस्ट घेऊन सुरक्षा फीचर्सबाबत सांगितलं जातं. नुकतंच मेड इन इंडिया फोक्सवॅगन व्हर्टूसला लॅटीन एनसीएपी टेस्टमध्ये 5 स्टार सुरक्षा रेटिंग प्रदान करण्यात आली आहे. प्रौढ रहिवासी संरक्षण चाचणीत या गाडीला 36.94 गुण (92%) मिळाले. यात फ्रंटल आणि साइड इफेक्ट क्रॅश चाचण्यांचा समावेश होता. बाल संरक्षण चाचणीमध्येही या गाडीनं चांगलं प्रदर्शन केलं आहे. फोक्सवॅगन व्हर्टसमध्ये अपघातावेळी ड्रायव्हर आणि प्रवाशाचं डोकं-मानेचे आणि ड्रायव्हरचं छातीचे संरक्षण केलं. व्हर्टसने पादचारी संरक्षणात 25.48 गुण (53.09%) आणि सुरक्षा सहाय्यामध्ये 36.54 गुण (84.98%) मिळवले. 

साइड इम्पॅक्टच चाचणीत गाडीनं डोके, पोट आणि छातीचं योग्यरित्या संरक्षण केलं. साइड पोल अपघातही गाडीनं व्यवस्थित सुरक्षा प्रदान केली. फोक्सवॅगन चाचणी केलेल्या मॉडेलमध्ये इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC), सर्व आसन स्थानांसाठी सीटबेल्ट रिमाइंडर आणि स्पीड असिस्ट सिस्टम होते.

भारतातील फोक्सवॅगन व्हर्टूस दोन इंजिन पर्यायांसह येते. यात 1.0L, 3-सिलेंडर TSI टर्बो-पेट्रोल आणि 1.5L, 4-सिलेंडर TSI पेट्रोल आहे. पहिलं इंजिन 115bhp कमाल पॉवर आणि 178Nm पीक टॉर्क जनरेट करते. तर, दुसरं इंजिन 150bhp कमाल पॉवर आणि 250Nm पीक टॉर्क निर्माण करते. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये 6-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक आणि 7-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक (फक्त 1.5L पेट्रोल प्रकारात) समाविष्ट आहे.

बातमी वाचा- POCO चा 50MP आणि 5000mAh बॅटरी असलेला 5G स्मार्टफोन फक्त 999 रुपयात, जाणून घ्या कसं ते

फोक्सवॅगन व्हर्टस कम्फोर्लाइन, हायलाइन, टॉपलाइन आणि जीटी प्लस चार ट्रिममध्ये येते. त्याची किंमत 11.32 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 18.42 लाख रुपयांपर्यंत जाते. मॉडेल लाइनअपमध्ये Highline AT, Topline AT आणि GT Plus तीन स्वयंचलित प्रकार आहेत. ज्यांची किंमत अनुक्रमे 14.48 लाख, 16 लाख आणि 18.42 लाख आहे. या सर्व किमती एक्स-शोरूम आहेत.

Read More