Marathi News> टेक
Advertisement

व्होडाफोनचा धमाका, वापरा ८४ दिवस अनलिमिटेड डेटा

व्होडाफोनने काही ठीकाणी २०० रुपयाच्या आतले प्लान लॉन्च केल्यानंतर आता काही नवे प्लान आणले आहेत. 

व्होडाफोनचा धमाका, वापरा ८४ दिवस अनलिमिटेड डेटा

मुंबई : वोडाफोन इंडियाने आपल्या 'सुपर प्लान' सिरीज अंतर्गत अंतर्गत नवा टॅरिफ प्लान आणला आहे. या नव्या प्लानची तुलना एअरटेलच्या 'प्री-पेड प्रॉमिस टॅरिफ प्लान'सोबत केली जाते.

व्होडाफोनने काही ठीकाणी २०० रुपयाच्या आतले प्लान लॉन्च केल्यानंतर आता काही नवे प्लान आणले आहेत. 

व्होडाफोनचे सुपर प्लान्स 

व्होडाफोनने सुपर प्लान्स लाइनअपमध्ये ४०९ रुपये आणि ४५९ रुपयाचे दोन नवे प्लान आणले आहेत.

जिथे वोडाफोन ३ जी/४जी कवरेज नाहीए तिथे वोडाफोन सुपर प्लान स्किम पोहोचविणे हे या प्लानचे उद्धीष्ट आहे. 

प्लानविषयी 

 वोडाफोनच्या ४०९ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड वॉईस कॉलसोबत २जी डेटा दिला जात आहे. याशिवाय ७० दिवसांच्या वॅलिडीटी प्लानमध्ये दररोज २ जी डेटा दिला जात आहे.

त्याशिवाय ७० दिवसांच्या वॅलिडिटी प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस दिले जात आहेत.

४५९ रुपयांच्या प्लानचे सर्व फायदे यामध्ये असणार आहेत. फक्त यामध्ये प्लान्सची वॅलिडीटी ८४ दिवसांची राहणार आहे. 

परवडणारी किंमत 

या प्लान्सची किंमत अनेक ठिकाणी परवडणारी आहे. जम्मू काश्मीरमध्ये ४०९ ला मिळणारा प्लान ३५९ रुपयांत मिळत आहे.

तसेच काही सर्कल्समध्ये ४५९ रुपयांच्या प्लानची किंमत ४०९ रुपये ठेवली आहे. 

या ठिकाणी प्लान 

४०९ आणि ४५९ रुपयांच्या किंमतीचा प्लान आंध्र प्रदेश आमि तेलंगना, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड,, बिहार आणि झारखंड, हिमाचल प्रदेश सर्कलमध्ये असणार आहे. 

व्होडाफोनने हे दोन प्लान गुप्त पद्धतीने लॉन्च केले आहेत. १७६ रुपयांचा सुपर प्लान आणल्यानंतर हा प्लान लॉन्च करण्यात आला आहे.

१७६ रुपयांच्या प्लानमध्येही २८ दिवसांपर्यत सर्व फायदे घेता येणार आहेत.  

Read More