Marathi News> टेक
Advertisement

whatsappवर ग्रुप न बनवता एकाच वेळी 256 लोकांना मेसेज पाठवणं शक्य... फक्त ही ट्रीक वापरा

एकदा का आपल्याला युक्ती माहीत झाली की, मग चॅटिंगचा अनुभव आणखी चांगला होऊ लागतो.

whatsappवर ग्रुप न बनवता एकाच वेळी 256 लोकांना मेसेज पाठवणं शक्य... फक्त ही ट्रीक वापरा

मुंबई : फेसबुकचे इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप हे जगभरात अतिशय लोकप्रिय अ‍ॅप आहे, ते एकमेकांशी जोडलेले राहण्यासाठी एक उत्तम माध्यम आहे. यामध्ये लोकांसाठी चॅटींग, फोटो आणि व्हिडीओ शेअरिंग सारखे पर्याय देखील उपलब्ध आहे. यूजर्स अ‍ॅपशी जोडले जावेत यासाठी कंपनी नेहमीच काही ना काही अपडेट त्यात करत असते. आपण सर्वजण हा अ‍ॅप वापरतो, परंतु तुम्हाला माहिती आहे का की अ‍ॅपमध्ये अशा अनेक गोष्टी दडलेल्या आहेत, ज्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे.

पण एकदा युक्ती माहीत झाली की, मग चॅटिंगचा अनुभव आणखी चांगला होऊ शकतो. एखादा मॅसेज आपल्याला जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला ग्रुप बनवावा लागतो. मग अशा वेळी लोकं असे विचार करतात की, अशी कोणती युक्ती आहे का की, मला ग्रुप न बनवता एकाच वेळी अनेक यूजर्सना मेसेज पाठवने शक्य होऊ शकेल? असं झालं असतं तर किती बरं झालं असतं.

असा विचार करणाऱ्या लोकांसाठी आमच्याकडे चांगली बातमी आहे कारण आज आम्ही तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही ग्रुप न बनवता अनेक लोकांना मॅसेज पाठवू शकता.

व्हॉट्सअ‍ॅपने अ‍ॅपमध्ये WhatsApp Broadcast List  नावाचे एक उत्तम वैशिष्ट्य दिले आहे, येथे लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा आहे की, ही एक सूची आहे आणि गट नाही. आपण या सूचीमध्ये एकाच वेळी 256 लोकांना जोडू शकता, परंतु यासाठी हे आवश्यक आहे की, त्यांच्या फोन नंबर आपल्या फोनबुकमध्ये जतन केलेला असावा.

व्हॉट्सअ‍ॅप ब्रॉडकास्ट लिस्ट कशी तयार करावी
1) सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप उघडावे लागेल आणि नंतर वरच्या उजव्या बाजूला दाखवलेल्या तीन डॉट मेनूवर क्लिक करा.

2) यानंतर तुम्हाला येथे न्यू ब्रॉडकास्ट पर्यायावर क्लिक करावे लागेल.

3) न्यू ब्रॉडकास्टवर क्लिक केल्यानंतर, सर्व संपर्कांच्या नावांची यादी तुमच्या समोर येईल, ज्यांना तुम्ही एकत्र आणि समान संदेश पाठवू इच्छिता त्यांच्या नावावर टॅप करा त्यांना यादीत जोडा.

4) सर्व संपर्क निवडल्यानंतर, खाली दर्शवलेल्या हिरव्या टिक वर क्लिक करा आणि आपली यादी तयार आहे.

पूर्वी, जेव्हा आपल्याला एकसारखा मॅसेज जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा असतो, तेव्हा लोकांना त्यांना एक एक करून मॅसेज पाठवायला लागायचे. परंतु आता ही यादी तयार झाल्यानंतर तुम्हाला इतका त्रास घेण्याची गरज नाही.

जेव्हा आपण एकाच वेळी एकापेक्षा जास्त लोकांना एक सामान्य संदेश पाठवू इच्छितो तेव्हा त्या संपर्कांची एक प्रसारण सूची तयार करा आणि नंतर संदेश पाठवा, असे केल्याने आपला संदेश त्याच वेळी सूचीमध्ये जोडलेल्या लोकांपर्यंत पोहोचेल.

Read More