Marathi News> टेक
Advertisement

Twitter ने केली नवी घोषणा, शक्य तितक्या लवकर बदला पासवर्ड

ट्विटरने त्यांच्या 33 कोटी युजर्ससाठी एक नवी आणि महत्त्वाची घोषणा केली आहे.

Twitter ने केली नवी घोषणा, शक्य तितक्या लवकर बदला पासवर्ड

 मुंबई : ट्विटरने त्यांच्या 33 कोटी युजर्ससाठी एक नवी आणि महत्त्वाची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी ट्विटवर एक इंटरनल बग सापडला आहे. त्याला ताबडतोब हटवण्याचे प्रयत्न करण्यात ट्विटरला यश आले आहे. या बगमुळे युजर्सच्या डाटावर कोणताही परिणाम झालेला नाही.परंतू ट्विटरने युजर्साना त्यांचा पासवर्ड बदलण्याचा सल्ला दिला आहे.  

 ट्विटरचं खास ट्विट   

 ट्विटरने केलेल्या ट्विट नुसार, एका इंटरनल बगमुळे अनेक युजर्सचे सुरक्षित पासवर्डचा खुलासा झाला आहे. त्यामुळे युजर्सने त्यांचे पासवर्ड बदलावेत असे ट्विटरकडून खुले करण्यात आले आहे. भविष्यात पुन्हा अशी समस्या येणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असे सांगण्यात आले आहे. 

 

 ट्विटरवरही डाटा विकल्याचा आरोप  

 ट्विटरवरही डाटा विकल्याचा आरोप लावण्यात आला आहे. फेसबुकप्रमाणेच ट्विटरनेही कॅम्ब्रिज एनालिटाला माहिती विकल्याचा आरोप लावण्यात आला आहे. यानंतर खूप प्रश्न उठवण्यात आले आहेत.  

Read More