Marathi News> टेक
Advertisement

Car Under 4 Lakh: 4 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या कार, या दिवाळीला आणा आपल्या आवडीची गाडी

Affordable Cars: मारुती सुझुकी अल्टोची सुरुवातीची किंमत 3.39 लाख रुपये आहे. ही त्याच्या बेस व्हेरियंटची एक्स-शोरुम, STD (O) दिल्लीतील किंमत आहे. Alto मध्ये 796 cc 3-सिलिंडर इंजिन आहे, जे 6000 rpm वर 35.3 kW पॉवर आणि 3500 rpm वर 69 Nm टॉर्क जनरेट करते.  

Car Under 4 Lakh: 4 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या कार, या दिवाळीला आणा आपल्या आवडीची गाडी

Cheap Cars: अनेक लोक कार खरेदी करण्यासाठी दिवाळीची प्रतीक्षा करत  असतात. कारण त्यांना दिवाळीच्या आसपास चांगल्या ऑफर मिळतात आणि लोकांना या आनंदाच्या प्रसंगी खुलेपणाने खरेदी करण्याची इच्छा असते. तुम्हीही दिवाळीत स्वत:साठी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल पण बजेट कमी असेल तर आम्ही तुम्हाला अशाच काही वाहनांची (Cheap Cars) माहिती देणार आहोत, ज्यांची किंमत 4 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. जरी, त्यांची ऑन-रोड किंमत 4 लाख रुपयांपेक्षा थोडी जास्त असू शकते. परंतु एक्स-शोरूम किंमत 4 लाख रुपयांपेक्षा कमी असेल.

Maruti Suzuki Alto

मारुती सुझुकी अल्टोची सुरुवातीची किंमत 3.39 लाख रुपये आहे. ही त्याच्या बेस व्हेरियंटची एक्स-शोरुम STD (O) , दिल्लीतील किंमत आहे. Alto मध्ये 796 cc 3-सिलिंडर इंजिन आहे, जे 6000 rpm वर 35.3 kW पॉवर आणि 3500 rpm वर 69 Nm टॉर्क जनरेट करते. हे 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. याचे मायलेज 22 kmpl च्या वर आहे. याशिवाय मारुती सुझुकीने नुकतीच Alto K10 देखील लॉन्च केली आहे. दोन्हींची सध्या विक्री केली जात आहे.

Maruti Suzuki Alto K10

मारुती सुझुकी अल्टो K10 चे मायलेज 24 kmpl पेक्षा जास्त आहे. यात 998 सीसी इंजिन आहे, जे 67 PS पॉवर आणि ८९ एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. यात 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. AGS देखील कंपनीने ऑफर केली आहे. त्याची सुरुवातीची किंमत 3.99 लाख रुपये आहे. यामध्ये त्याचा LXI प्रकार येतो. ही एक्स-शोरूम, दिल्ली किंमत आहे. यात 27 लिटरची इंधन टाकी आहे. सुरक्षेसाठी दोन एअरबॅगही उपलब्ध आहेत.

Maruti Suzuki S-Presso

मारुती सुझुकी एस-प्रेसोची सुरुवातीची किंमत 4 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. पण, साधारणपणे दिवाळीला मिळणाऱ्या ऑफर्समध्ये ते 4 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीतही मिळू शकते. त्याची एक्स-शोरूम किंमत 4.25 लाख रुपये आहे. यात 998 cc K-सिरीज इंजिन आहे.

Read More