Marathi News> टेक
Advertisement

डिट्टो 'रोल्स रॉयस'! ही कार पाहून सारेच म्हणतील, "वा काय रॉयल 'कार'भार आहे"

Toyota Century SUV Features : तुम्ही कारच्या विश्वात रमता का? एक नवं मॉडेल नक्कीच तुमच्या विशलिस्टमध्ये असायला हवंय. कारण, हे मॉडेल तुम्हाला कारच्या अनोख्या विश्वात घेऊन जाईल.   

डिट्टो 'रोल्स रॉयस'! ही कार पाहून सारेच म्हणतील,

Toyota Century SUV Features : काही कार निर्मात्या कंपन्या कारप्रेमींच्या विशेष आवडीच्या. वर्षानुवर्षांपासून मिळणारी त्यांची Service आणि विश्वासार्हतेच्या बळावर होणारा कारचा खप या साऱ्याची गणितं सहाजीकच या कार कंपन्यांच्या नवनवीन तंत्रज्ञान आणि त्यांच्या कारच्या मॉडेल्सवर अवलंबून असतो. अशाच कंपन्यांच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे टोयोटा. 

या मुळच्या जपानी कंपनीनं हल्लीच ग्लोबल मार्केटमध्ये त्यांच्या एमपीवी Toyota Vellfire च्या नेक्सट जनरेशन मॉडेलला सादर केलं. शिवाय कंपनीनं यावेळी त्यांच्या Century च्या पुनरागमनाचेही संकेत दिले. साधारण 60 च्या दशकामध्ये आलेल्या Toyota Century सेडाननं सर्वांनाच वेड लावलं होतं. तेव्हापासून होणाऱ्या या कारचा खप आजही सुरुच आहे. त्यातच आता ही कार नवं एसयुव्ही मॉडेल सादर करणार आहे. ज्यामुळं कार ड्रायव्हिंगचा एक अद्वितीय अनुभव कारप्रेमींना मिळणार आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत ही कार लॉन्च केली जाऊ शकते असा अंदाज ऑटोमोबाील क्षेत्रातील जाणकारांनी वर्तवला आहे. 

हेसुद्धा वाचा : तयार व्हा! 15 ऑगस्टला लाँच होतीये 5 डोअर Mahindra Thar; जाणून घ्या काय आहे खास

 

सेंच्युरी सेडानमागोमाग येणारी ही एसयुव्ही त्यांच्या सेंच्युरी बॅजमधीच दुसरं मॉडेल असेल. ही सेडान कार मुख्यत्वे जपानमध्ये विकली जाते. पण, नवी एसयुव्ही जपानव्यतिरिक्त ही कार आता इतरही बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. येत्या काळात लाँच होणारी ही एसयुव्ही ब्रँडच्या प्रसिद्धीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. प्राथमिक अंदाजांनुसार ही कार एक मोनोकॉक एसयुव्ही असणार आहे. ज्यामध्ये अद्वितीय लक्झरी फिचर्ससह अद्ययावत तंत्रज्ञानानं परिपूर्ण सुविधा देण्यात येतील. या कारमध्ये व्ही12 पेट्रोल इंजिनचा वापर करण्यात येण्याची शक्यता असली तरीही अद्याप त्याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

fallbacks

शहरात उत्तम धावणार... 

ही कार ऑफरोडिंगऐवजी सिटी राईड अर्थात शहरातील रस्त्यांवर उत्तम धावेल. यामध्ये मदत करतील ते म्हणजे कारला असणारी मोठी चाकं. मुख्य म्हणजे ही कार जास्तीत जास्त चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तिचा लूक. पाहताक्षणी ही कार रोल्स रॉयसचीच आठवण करून देते. तिचं फ्रंट ग्रिल, हेडलाईट आणि क्रोम प्लेटिंग पाहताना ही रोल्स रॉयसचं मिनी वर्जन आहे की काय हाच प्रश्न पडतो.  

टोयोटा सेंच्युरीची लांबी अंदाजे 5.2 मीटर आणि रुंदी 2 मीटर इतकी असू शकते. काही जाणकारांनी केलेल्या दाव्यानुसार ही सेंच्युरी लँड क्रुजरच्या तुलनेत काहीशी महाग असेल. थोडक्यात टोयोटाच्या आतापर्यंतच्या सर्व कारमध्ये या कारसाठी सर्वाधिक पैसे मोजले जाणार आहेत. 

Read More