Marathi News> युथ क्लब
Advertisement

WFH:वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी हे पाच ऍप अतिशय उपयुक्त या विषयी जाणून घ्या........

 या कोरोना साथीमुळे बहुतेक ऑफिसमध्ये वर्क फ्रॉम होम सिस्टमद्वारे काम सुरू आहे. खासगी कर्मचाऱ्यांना 

WFH:वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी हे पाच ऍप अतिशय उपयुक्त या विषयी जाणून घ्या........

मुंबई : या कोरोना साथीमुळे बहुतेक ऑफिसमध्ये वर्क फ्रॉम होम सिस्टमद्वारे काम सुरू आहे. खासगी कर्मचाऱ्यांना आणि सरकारी कर्मचार्‍यांनाही घरून काम करावे लागत आहे. अशा परिस्थितीत हे पाच अ‍ॅप्स आहेत, जे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतील.

माइक्रोसॉफ्ट टीम्स

मायक्रोसॉफ्ट टीम हा ऍप उपयुक्त आहे.  ऑडिओ-व्हीडिओ कम्युनिकेशनसाठी हा ऍप सर्वोत्कृष्ट आहे. या ऍपद्वारे थर्ड पार्टी ऍप इंटीग्रेशन, फाईल स्टोरेज, मेसेजिंगसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. या ऍपमध्ये  केवळ ऑनलाइन कॉल दरम्यान फायली शेअर करण्याचा पर्याय आहे. फक्त हेच नाही,  मायक्रोसॉफ्ट टीम्सद्वारे आपली स्क्रीन देखील आपण शेअर करू शकता.

झूम

कोरोना महामारीच्या काळात व्हिडिओ कॉल करण्यासाठी झूम हा ऍप लोकप्रिय बनला आहे. विशेषत: ऑफिस मीटींग आणि छोट्या ऑनलाइन कॉन्फरन्ससाठी व्हिडिओ कॉलिंगसाठी हा ऍप सर्वोत्कृष्ट मानला जातो. व्हिडिओ कॉल केवळ ग्रूपद्वारेच होऊ शकत नाही, तर वन-टू-वन माध्यमातून देखील केला जाऊ शकतो. यात आपणास व्हिडिओ बंद करायचा असेल तर आपण केवळ ऑडिओद्वारे कोणाशीही संपर्क साधू शकता.

क्रोम रिमोट डेस्कटॉप

क्रोम रिपोर्ट डेस्कटॉप काही खास ऍप्सपैकी एक आहे, या ऍपच्या मदतीने आपण जगातील कोणत्याही भागात बसून आपल्या कंप्यूटरवर एक्सेस करू शकता. त्यासाठी फक्त इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे. इतकेच नव्हे तर, गूगल रिमोट डेस्कटॉपद्वारे आपले सहकारी आपल्या कंप्यूटरवरील फाईलमध्ये देखील एक्सेस करू शकता.

टॉगल

टॉगल हे एक खास टूल्सपैकी एक आहे ज्याद्वारे आपण आपल्या ऍक्टिविटी ट्रॅक करू शकता. याद्वारे आपण आपल्या कर्मचार्‍यांच्या कामाचा मागोवा घेऊ शकता. या ऍपद्वारे आपण फ्रीलान्स प्रकल्पांचे काम करणाऱ्यांचा मागोवा घेऊ शकता.

गूगल ड्राइव

गूगल ड्राइव्ह आपल्यासाठी सर्वोत्कृष्ट ऍप्सपैकी एक आहे. कारण आपण आपले काम आपल्या सिस्टमवर सेव करू शकत नाही आणि ते गूगल ड्राइव्हवर सेव करू शकता आणि त्यानंतर आपण कुठूनही त्यात एक्सेस करू शकता. या व्यतिरिक्त आपण गूगल  ड्राइव्हमध्ये  सेव केलेल्या फाईल्स आपल्या टीमसोबत शेअर करू शकता. रिअल टाइमसाठी हे सर्वोत्तम टूल आहे.

Read More