Marathi News> टेक
Advertisement

Airtel यूझर्सना मोठा झटका, कंपनीकडून 'या' रिचार्जच्या किंमतीत वाढ

आता यूझर्सना रिचार्जसाठी (Recharge) अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे यूझर्समध्ये नाराजीचं वातावरण आहे.  

Airtel यूझर्सना मोठा झटका, कंपनीकडून 'या' रिचार्जच्या किंमतीत वाढ

मुंबई :  एअरटेल (Airtel) यूझर्ससाठी वाईट बातमी समोर आली आहे. भारती एअरटेलने मिनिमत रिचार्जच्या किंमतीत (Minimum Recharge Plan) वाढ केली आहे. कंपनीने 155 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे एसएमएस (SMS) आणि व्हॉइस प्लॅन्स (Voice Plans) वगळले आहेत. त्यामुळे आता यूझर्सना रिचार्जसाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे यूझर्समध्ये नाराजीचं वातावरण आहे. (telecom company bharti airtel incresed minimum recharge plan rate for haryana odisha sector)

कंपनीच्या या निर्णयामुळे आता यूझर्सना दर महिन्याला किमान 155 रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. कंपनीने कोणताही नवा रिचार्ज प्लॅन लॉंच केलेला नाही. तर 99 रुपयांचा बेसिक प्लॅन बंद केलाय. यानंतर आता यूझर्सकडे 155 रुपयांचा रिचार्ज करण्याशिवाय पर्याय नाही. हा निर्णय फक्त हरियाणा आणि ओडीसातील यूझर्ससाठी लागू असणार आहे.

155 रुपयांच्या रिचार्जमध्ये काय मिळणार? 

यूझर्सना या 155 रुपयांच्या रिचार्जमध्ये 24 दिवस अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, 1 जीबी डेटा आणि  300 एसएमएस मिळणार आहेत.

99 रुपयांच्या रिचार्जमध्ये काय-काय?

या 99 रुपयांच्या रिचार्जमध्ये 28 दिवसांसाठी 200 एमबी डेटा दिला जातो. थोडक्यात काय तर जास्त पैसे खर्च करुन कमी वॅलिडिटी असलेला रिचार्ज प्लॅन मिळेल. 

Read More