Marathi News> टेक
Advertisement

'हे' अ‍ॅप तुमच्या फोनमधून आताच काढा...नाहीतर तुमचे WhatsApp कायमचे होऊ शकते बंद

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांना दररोज काही नवीन वैशिष्ट्ये आणत असतो परंतु कंपनी अजूनही अशा अनेक वैशिष्ट्यांचा शोध घेत आहे. जी इतर अ‍ॅप्समध्ये आहेत.

'हे' अ‍ॅप तुमच्या फोनमधून आताच काढा...नाहीतर तुमचे WhatsApp कायमचे होऊ शकते बंद

मुंबई : व्हॉट्सअ‍ॅपवर आपण बऱ्याच गोष्टी करतो. आपण आपल्या जवळच्यांना किंवा मित्र परिवाराला मॅसेज पाठवतो, फोटो आणि व्हिडीओ देखील आपण त्याच्यावरुन शेअर करु शकतो. परंतु तुम्हाला माहित आहे का? की एक असा अ‍ॅप आहे जो तुम्हाला वापरण्यास भारी पडू शकते आणि मेसेंजर प्लॅटफॉर्म तुम्हाला तुमच्या मेसेजिंग अ‍ॅपवर कायमची बंदी घालू शकते.

यामुळे तुमचे खाते देखील कायमचे बंदी केले जाऊ शकते. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांना दररोज काही नवीन वैशिष्ट्ये आणत असतो परंतु कंपनी अजूनही अशा अनेक वैशिष्ट्यांचा शोध घेत आहे. जी इतर अ‍ॅप्समध्ये आहेत. आणि म्हणूनच लोक व्हॉट्सअ‍ॅप व्यतिरिक्त इतर अॅप्स वापरतात.

या फीचरमध्ये ऑटो-रिप्लाई, शेड्यूलिंग चॅट आणि बरेच काही समाविष्ट आहे. काही डेव्हलपर्सनी फॅन्सी फीचर्स वापरून एक अ‍ॅप तयार केले आहे, ज्यामध्ये युजर्स त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅट ट्रान्सफर करू शकतात. तुम्ही असे म्हणू शकता की, ही व्हॉट्सअ‍ॅपची अनधिकृत आवृत्ती आहे.

हे अ‍ॅप हुबेहुब व्हॉट्सअ‍ॅपसारखे दिसते पण तुम्हाला यामध्ये अशी अनेक अनोखी वैशिष्ट्ये मिळतात जी तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपमध्ये मिळत नाहीत. आम्ही येथे GB WhatsApp आणि WhatsApp Plus बद्दल बोलत आहोत.

GB WhatsApp म्हणजे काय?

GB WhatsApp ही व्हॉट्सअ‍ॅपची पर्यायी किंवा सुधारित आवृत्ती आहे. हे अ‍ॅप WhatsAppपेक्षा पूर्णपणे भिन्न आहे आणि आपण ते एपीके म्हणून डाउनलोड करू शकता कारण ते ना अ‍ॅपल स्टोअरवर उपलब्ध आहे, ना गुगल प्ले स्टोअरवर.

हे थर्ड पार्टी अ‍ॅप विकासकांनी बनवले आहे. अशा परिस्थितीत, या अ‍ॅपचा व्हॉट्सअ‍ॅप इंकशी कोणताही संबंध नाही. जीबी व्हॉट्सअ‍ॅप ओरिजिनल्सची कोणतीही बनावट आवृत्ती नाही किंवा ते कोणतेही नवीन अ‍ॅप नाही.

व्हॉट्सअ‍ॅपने अ‍ॅपच्या वापराबाबत चेतावणी दिली आहे

या वैशिष्ट्यांमुळे, वापरकर्त्यांनी हे अ‍ॅप डाउनलोड करणे सुरू केले आहे. तथापि, व्हॉट्सअ‍ॅप वेळोवेळी वापरकर्त्यांना चेतावणी देत ​​राहतो की, लोकांनी त्यापासून दूर राहावे.

2019 मध्ये व्हॉट्सअ‍ॅपने जीबी व्हॉट्सअ‍ॅपशी संबंधित खात्यांवर बंदी घातली होती. त्याच वेळी, वापरकर्त्यांना देखील चेतावणी देण्यात आली की, जो कोणी त्याचा वापर करेल, त्याच्या खात्यावर कायमची बंदी घातली जाईल.

GB WhatsApp  वापरण्यात काय धोका आहे?

आता तुम्ही विचार करत असाल की, हे अ‍ॅप वापरण्याने काय धोका होऊ शकतो? तर या अ‍ॅपमध्ये कोणतीही सुरक्षा तपासणी नाही. मूळ अ‍ॅप प्रमाणे, आपला डेटा यामध्ये संरक्षित नाही. त्याच वेळी, तुम्हाला गोपनीयतेबाबत कोणतेही संरक्षण मिळत नाही. याशिवाय जर तुम्ही APK डाऊनलोड करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या डिव्हाइसमध्ये धोकादायक व्हायरस येऊ शकतो आणि मग तुमचे डिव्हाइस हॅकही होऊ शकते.

म्हणूनच, मूळ व्हॉट्सअ‍ॅप नेहमी वापरकर्त्यांना माहिती देत ​​राहतो की त्यांनी अशा अ‍ॅप्सपासून दूर राहावे आणि त्यांचा वापर करू नये.

Read More