Marathi News> टेक
Advertisement

शरीराच्या ऊर्जेतून उपकरणांना चार्ज करणार हा 'कपडा'

'ऍडव्हान्स्ड मटेरियल्स टेक्नॉलॉजी'मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात या कपड्याबद्दलची माहिती देण्यात आलीय

शरीराच्या ऊर्जेतून उपकरणांना चार्ज करणार हा 'कपडा'

बोस्टन : तंत्रज्ञान प्रत्येक दिवशी आपलं रुप बदलंतय. सगळ्यात वेगानं कशात बदल होत असेल तर तो बदल आहे तंत्रज्ञानातला... विज्ञानाच्या जगातील हे अविष्कार एखाद्या चमत्कारापेक्षा कमी ठरत नाहीत. नुकत्याच समोर आलेल्या एका शोधाबद्दल ऐकून तुमचे डोळेही विस्फारतील... हा शोध आहे एका कपड्याचा... पण हा काही साधा-सुधा कपडा नाही. वैज्ञानिकांनी अतिशय मेहनतीनं तयार केलेल्या या कपड्याच्या माध्यमातून मानवाच्या शारीरिक उष्णतेमधून 'ऍक्टिव्हिटी ट्रॅकर्स'सारख्या छोट्या इलेक्ट्रानिक उपकरणांना चार्ज केलं जाऊ शकतं. 

अमेरिकेच्या मॅन्सॅच्युसेटस् एमहर्स्ट विद्यापीठाच्या तृषा ऍन्ड्र्यू यांच्या म्हणण्यानुसार, परिधान करता येऊ शकतील असे बायोसेन्सर, डाटा ट्रान्समिटर आणि अशाच काही उपकरणांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी रचनात्मकरित्या छोट्या आकाराचं बनवण्यात आलंय. परंतु, अशा उपकरणांना अधिक चार्जिंगची आवश्यकता असते... आणि सामान्यत: उपकरणांना ऊर्जा देणारे यंत्र वजनानं जड असतात. त्यामुळे ते चालताना किंवा फिरताना घेऊन जाण्यास यूझर्सना गैरसोईचं पडतं.

'ऍडव्हान्स्ड मटेरियल्स टेक्नॉलॉजी'मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात या कपड्याबद्दलची माहिती देण्यात आलीय. शरीराचं तपमान आणि एम्बियंट कूलर एअरच्या फरकाचा फायदा घेत शरीराच्या उष्णतेपासून ऊर्जा निर्माण केली जाऊ शकते. या ऊर्जेच्या माध्यमातून उपकरणं चार्ज केली जाऊ शकतात. 

शोधकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, 'साधारणत: आठ तास काम करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरातून थोडी ऊर्जा घेता येऊ शकते. परंतु, यासाठी आवश्य असणाऱ्या विशेष वस्तू महागड्या किंवा घातक आहेत. त्यामुळेच आम्ही या माध्यमातून स्वस्त बाष्पीकृत प्रिंट जैव अनुकूल, लवचिक आणि हलका पॉलीमर सुती कपडा बनवलाय. हा कपडा कोणत्याही छोट्या उपकरणांना ऊर्जा देण्यासाठी किंवा चार्ज करण्यासाठी पुरेसा असेल'.

Read More