Marathi News> टेक
Advertisement

Reliance AGM 2021: Googleसोबत Jioने केलं टायअप, भारतातील सर्वात स्वस्त 4G फोन, लवकरच लाँच

JioPhone Next अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. या स्मार्टफोनला सर्वोत्कृष्ट कॅमेरा आणि अँड्रॉइड अपडेटसुद्धा आहेत. 

Reliance AGM 2021: Googleसोबत  Jioने केलं टायअप, भारतातील सर्वात स्वस्त 4G फोन, लवकरच लाँच

मुंबई : गूगलच्या (Google) मदतीने रिलायन्स जिओने भारताचा सर्वात स्वस्त 4 G स्मार्टफोन तयार केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी 44 व्या एजीएम घोषणा केली की, ते  गणेश चतुर्थीला म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी बाजारात या फोनला लाँन्च करणार आहेत.

स्मार्टफोन अँड्रॉइडवर चालतील

असे सांगितले जात आहे की, JioPhone Next अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. या स्मार्टफोनला सर्वोत्कृष्ट कॅमेरा आणि अँड्रॉइड अपडेटसुद्धा आहेत. ज्यामुळे हे युझर्स गुगल प्ले वरून अ‍ॅप्स डाउनलोड करण्यासही सक्षम असतील. मात्र, कंपनीने अद्याप JioPhone Next च्या किंमतींबद्दल खुलासा केलेला नाही. परंतु तज्ञांचा असा विश्वास आहे की, त्याची किंमत ही खूपच कमी ठेवली जाईल आणि हा स्मार्टफोन मोबाईल इंडस्ट्रीमध्ये गेम चेंजर देखील सिद्ध होईल.

लोकांना वेगवान इंटरनेटचा आनंद घेता येईल

गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुंदर पिचाई यांनी नवीन स्मार्टफोनबद्दल सांगितले की, 'गुगल आणि जिओने मिळून भारतासाठी परवडणारे आणि स्वस्तातले जिओ स्मार्टफोन बनवले आहे. यामुळे लाखो नवीन यूझर्सला स्वस्तातले मोबाईल घेणे  शक्य होईल.  ज्यामुळे अधिक भारतीय फास्ट इंटरनेटशी कनेक्ट होऊ शकतील.

Read More