Marathi News> टेक
Advertisement

भारतीय बाजारात Redmi Note 9 pro लॉन्च; काय आहेत फिचर्स

जाणून घ्या या फोनची किंमत आणि फिचर्स

भारतीय बाजारात Redmi Note 9 pro लॉन्च; काय आहेत फिचर्स

नवी दिल्ली : शाओमीने दोन नवे स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केले आहेत. शाओमीने हे स्मार्टफोन रेडमी नोट ९ सीरीजअंतर्गत लॉन्च केले आहेत. कंपनीने बहुचर्चित Redmi Note 9 pro स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. Redmi Note 9 Pro सह Redmi Note 9 Pro Max हा फोनही लॉन्च करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या स्मार्टफोनची चर्चा होती. Redmi Note 9 सीरीजमध्ये रियर क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 

कंपनीने Redmi Note 9 Pro दोन प्रकारात बाजारात लॉन्च केला आहे. ४ जीबी रॅम, ६४ जीबी मेमरी आणि दुसरा ६ जीबी रॅम, १२८ जीबी मेमरी असणारे हे दोन फोन आहेत. ४ जीबी रॅम असणाऱ्या फोनची किंमत १२,९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम असणाऱ्या फोनची किंमत १५,९९९ रुपये इतकी आहे. 

काय आहेत Redmi Note 9 Pro फिचर्स - 

- ६.६७ इंची डिस्प्ले
- फ्रन्ट-बॅक दोन्ही बाजूला गोरिला ग्लास ५ प्रोटेक्शन 
- Qualcomm SM7125 Snapdragon 720G प्रोसेसर
- चार कॅमेरा रियर सेटअप
- पहिला कॅमेरा ४८ मेगापिक्सल, दुसरा कॅमेरा ८ मेगापिक्सल आणि तिसरा-चौथा कॅमेरा २-२ मेगापिक्सल देण्यात आला आहे. 
- सेल्फी १६ मेगापिक्सल वाईट कॅमेरा 
- 5020 mAh बॅटरी

'रेडमी नोट ९ प्रो' Aurora Blue, Glacier White, Interstellar Black या तीन रंगात उपलब्ध आहे. 

Read More