Marathi News> टेक
Advertisement

Debit Card मध्ये Zero Balance असला तरी तुम्ही खरेदी करू शकता, कसं ते पाहा

EMI Without Credit Card:  या बँकेने एक सुविधा सुरू केली आहे जी तुम्हाला क्रेडिट कार्डशिवाय खरेदी करण्याची परवानगी देईल. बँक या योजनेंतर्गत बचत खात्यावर झटपट ईएमआयची सुविधा देत आहे.

Debit Card मध्ये Zero Balance असला तरी तुम्ही खरेदी करू शकता, कसं ते पाहा

Zero Down Payment Mobile Phone Online: सणासुदीच्या काळात नागरिकांना ऑनलाईन (online) किंवा ऑफलाईन (offline) खरेदी करायची असते. कारण यावेळी सर्वच शॉपिंग वेबसाइट्स (online shopping) जास्त प्रमाणात ऑफर्स देत असते. या आकर्षक ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी ग्राहकही खरेदी करत असतात. परंतु अनेक ज असे असतात की त्यांच्याकडे अपुरे पैसे असतात. परिणामी  त्यांना वस्तू खरेदी करताना काही अडचणीचा सामना करावा लागतो. पण जर तुमचे या बँकेत बचत खाते असेल तर तुम्ही क्रेडिट कार्डशिवाय (credit card) सहज खरेदी करू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या खात्यात पैसे ठेवावेत असे नाही. (online shopping offer shop from your saving account and pay in emi )

ICICI बँकेने ही सेवा सुरू केली

ICICI बँकेच्या या सुविधेचे नाव EMI @ Internet Banking आहे. यामध्ये प्री अप्रूव्ड कस्टमर्स डिजिटल (Pre Approved Customers Digital) मंजूर करून  50,000 रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंतच्या खरेदीचे EMI मध्ये डिजिटल रुपांतर करू शकतात. ही सुविधा फक्त इंटरनेट बँकिंगद्वारे उपलब्ध असेल.

तुम्हाला हवा तो EMI करा

ICICI बँकेच्या या सुविधेद्वारे तुम्ही तुमच्या बचत खात्यातून तुमच्या आवडीचे गॅझेट खरेदी करू शकता. विम्याचा हप्ता भरू शकता आणि मुलाच्या शाळेची फी देखील जमा करू शकता आणि नंतर हा खर्च इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्मद्वारे सुलभ हप्त्यांमध्ये भरू शकता. ग्राहक त्याच्या आवडीनुसार 3 महिने, 6 महिने, 9 महिने आणि 12 महिन्यांच्या EMI मध्ये खर्च भरू शकतो.

ICICI बँकेने एक करार केला

ICICI बँकेने EMI सुविधेसाठी BillDesk आणि Razorpay सारख्या प्रमुख ऑनलाइन पेमेंट गेटवे कंपन्यांशी करार केला आहे. सध्या EMI @ Internet Banking मध्ये 1000 व्यापारी सक्रिय आहेत ज्यात ऑनलाइन शॉपिंग पोर्टल, विमा, प्रवास, शिक्षण, शाळेची फी आणि इलेक्ट्रॉनिक्स साखळी यांचा समावेश आहे.

वाचा : Online Payment : चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे जमा झाल्यास परत कसे मिळतील? काय सांगतो RBIचा नियम?

याचा फायदा घ्या

सर्वप्रथम तुम्हाला अॅप किंवा वेबसाइटवर खरेदी करायचे असलेले उत्पादन निवडा. यानंतर जेव्हा पेमेंटचा प्रश्न येतो तेव्हा तुम्हाला ICICI बँक इंटरनेट बँकिंग निवडावी लागेल. तेथे तुमचा इंटरनेट बँकिंग आयडी आणि पासवर्ड टाका. येथे तुम्हाला Convert to EMI instantly वर क्लिक करावे लागेल. तुम्हाला किती महिन्यांचा EMI घ्यायचा आहे ते निवडा आणि फक्त OTP टाकून पैसे भरा. 

Read More