Marathi News> टेक
Advertisement

आयफोनला टक्कर देण्यासाठी येतोय वनप्लस 6 टी स्मार्टफोन

 आयफोनची मक्तेदारी पाहता वनप्लस 6 टी एन्ट्री महत्त्वपूर्ण मानली जातेयं.

आयफोनला टक्कर देण्यासाठी येतोय वनप्लस 6 टी स्मार्टफोन

मुंबई : वनप्लस 6 टी स्मार्टफोन आजपासून जगभरात उपलब्ध होणार आहे. अमेरिकन बाजारपेठेत आयफोनची मक्तेदारी पाहता वनप्लस 6 टी एन्ट्री महत्त्वपूर्ण मानली जातेयं. वनप्लस 6 टी स्मार्टफोन हा वनप्लसच्या पहिल्या फोनच्या तुलनेत थोडा वेगळा असणार आहे. वन प्लसने 29 ऑक्टोबरला नव्या स्मार्टफोनच्या ग्लोबल ओपनिंगची घोषणा केली होती. त्यांच्या अधिकृत साईटवर याचं लाईव्ह स्ट्रिमिंगही करण्यात येणार आहे.

ग्लोबल लॉंचिंग

सोशल नेटवर्किंग साईटवर देखील याचे लाईव्ह अपडेट पाहता येणार आहेत. वनप्लस 6 टी च्या ग्लोबल लॉंचिंगची सुरूवात न्यूयॉर्कमध्ये सकाळी 11 वाजता म्हणजे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साधारण साडेआठ वाजता होणार आहे.

एव्हाना वनप्लस 6 T शी संबंधित जाहिरातीही टीव्हीवर दिसू लागल्या आहेत. या स्मार्टफोनमध्ये कोणते फिचर्स असणार याबद्दल जाणून घेऊया.

खास फिचर्स 

वनप्लस 6 टीमध्ये हेडफोन जॅकसाठी कोणती जागा नसणार आहे. जॅक हटविल्याने जास्त स्पेस मिळाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

वनप्लस 6 टीमध्ये यूजर्सला वनप्लस 6 वाला प्रोसेसर मिळणार आहे. पण बॅटरीबद्दल विचाराल तर येणाऱ्या फोनची बॅटरी पहिल्यापेक्षा चांगली असणार आहे.

वनप्लस 6 च्या तुलनेत येणारा स्मार्टफोन पातळ असणार आहे. रॅम आणि स्टोरेजमध्ये कोणता बदल दिसणार नाही.

वनप्लस 6 T मध्ये कंपनी 6.4 इंच AMOLED डिस्प्ले देत आहे.  खूप चांगल्या फिचर्ससोबत याची किंमतही जास्त असणार आहे. 

Read More