Marathi News> टेक
Advertisement

आता इंस्टाग्राम स्टोरीमध्ये असे अॅड करा म्युझिक!

इंस्टाग्राम स्टोरीमध्ये म्युजिक अॅड करु शकता

आता इंस्टाग्राम स्टोरीमध्ये असे अॅड करा म्युझिक!

मुंबई : आता अगदी सहज तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये म्युजिक अॅड करु शकता. इंस्टाग्रामने गेल्या आठवड्यातच हे फिचर युजर्ससाठी सुरु केले. फेसबुकने अलिकडेच रेकॉर्ड लेबलसोबत करार केला होता. त्यामुळे या ट्यून्स आता इंस्टाग्रामवर उपलब्ध होईल. हे फिचर सध्या ऑस्ट्रेलिया, न्युझीलॅंड, फ्रॉन्स, जर्मनी, स्वीडन, युनाइटेड किंगडम आणि युनाइटेड स्टेट्ससाठी आहे. स्टिकर्स आणि जीआयएफ प्रमाणेच याचा वापर होतो.

आवडीचे म्युझिक अॅड करु शकता

इंस्टाग्राम स्टोरीसाठी फोटो किंवा व्हिडिओ शूट केल्यानंतर स्क्रिन वर उजवीकडे स्माईली बटनावर टॅप करा. तिथेच दुसऱ्या लाईनवर म्युजिक बटनाचा ऑप्शन दिसेल. त्यावर टॅप केल्यावर म्युझिक मेन्यू ओपन होईल. त्यातून तुमच्या आवडीचे म्युझिक तुम्ही सिलेक्ट करु शकता.

डिफॉल्ट म्युझिक

लोकप्रिय म्युझिक येथे तुम्हाला डिफॉल्ट मिळेल. याबरोबरच एका टॅब आहे. त्याच्या मदतीने तुमच्या मूडप्रमाणे तुम्ही म्युझिक सिलेक्ट करु शकता. जर तुम्हाला दुसरे म्युझिक हवे असल्यास तुम्ही डिरेक्टरी सर्चही करु शकता.

कस्टमाईज करण्याचा पर्याय

म्युझिक सिलेक्ट केल्यानंतर त्यावर फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करा. यात तुम्हाला कस्टमाईज करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. 

 

Read More