Marathi News> टेक
Advertisement

2019 च्या स्वागतासाठी गुगल डुडल तयार

ऍनिमेशनद्वारे करणार स्वागत 

2019 च्या स्वागतासाठी गुगल डुडल तयार

मुंबई : 2018 वर्षाचा आजचा शेवटचा दिवस. जगभरात नवीन वर्षाच्या 2019 च्या स्वागतासाठी आज रात्रीपासूनच सुरूवात होते. घडाळ्यात रात्रीचे 12 वाजताच नवीन वर्षाच्या स्वागताला सुरूवात होते. 

असं असताना सर्च इंजिन Google ने देखील आपलं डुडल तयार करून नवीन वर्षाला ते समर्पित केलं आहे. या अगोदर गुगलने खास क्षणाला डुडल तयार केलं आहे. जसं कुणा लोकप्रिय व्यक्तींचा वाढदिवस आणि इतर महत्वाच्या क्षणी गुगलने डुडल तयार करून याची माहिती नेटीझन्सना दिली आहे. 

आता गुगलने 2018 या वर्षातील शेवटचं गुगल डुडल तयार केलं आहे. हे या वर्षाचं शेवटचं डुडल असल्यामुळे ते खूप खास आहे. पाहूया काय आहे या डुडलमध्ये... 

fallbacks

गुगलने या डुडलकरता दोन ऍनिमेटेड हत्तीची पिल्लं बनवली आहे. जे फुगे आणि पॉपकॉर्नसोबत नवीन वर्षाच्या स्वागताची वाट पाहत आहेत. 

या डुडलमध्ये दोन घड्याळं देखील आहेत ज्यामध्ये 11:55 अशी वेळ दाखवण्यात आली आहे. डुडलमधील हे दोन छोटी पिल्ल नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असून खूप आनंद लुटताना दिसत आहे. 

एक पिल्लू यामध्ये फुग्यांशी खेळत आहे तर दुसरा पिल्लू पॉपकॉर्नसोबत खेळताना दिसत आहे. निळ्या रंगातील ही पिल्लं अतिशय सुंदर दिसत आहेत. 

जगभरात 2019 या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सगळे सज्ज आहे. 2018 या वर्षाने अनेकांना काही ना काही दिलं तर अनेकांकडून काही ना काही हिरावलं.

मनातील या सगळ्या गोष्टी एका कप्यात बंद करून आता प्रत्येकजण नवीन वर्षाच्या 2019 च्या स्वागतासाठी आनंदी आणि उत्सुक आहे. अगदी काही तासांत आपण 2018 ला Bye Bye करून 2019 ला वेलकम करणार आहोत. 

Read More