Marathi News> टेक
Advertisement

व्हॉट्सअॅपचं नवं फीचर, यूजर्ससाठी खुशखबर

जर तुम्ही व्हॉट्सअॅप वापरत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे.

व्हॉट्सअॅपचं नवं फीचर, यूजर्ससाठी खुशखबर

मुंबई : जर तुम्ही व्हॉट्सअॅप वापरत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. व्हॉट्सअॅपने आणखी एक फीचर लॉन्च केलं आहे. पिक्चर-इन-पिक्चर असं या फीचरचं नाव आहे. तुमच्या व्हॉट्सअॅपवर जर कोणता व्हिडिओ आला तर या फीचरतच्या मदतीने तुम्ही तो चॅट विंडोमध्येच पाहू शकता. म्हणजे व्हिडिओ पाहतांना तुम्ही चॅट देखील करु शकता. त्यासाठी तुम्हाला विंडोच्या बाहेर येण्याची गरज नाही. एक छोट्या विंडोमध्ये हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही तो थांबवू देखील शकता. सोबतच तुम्हाला व्हिडिओ फूल स्क्रीनवर पाहण्याचा ऑप्शन देखील मिळेल.

अँड्रॉईडमध्ये हे फीचर व्हॉट्सअॅपचे अपडेटेड व्हर्जन 2.18.380 मध्ये काम करेल. या फीचरसाठी तुम्हाला प्ले स्टोरमध्ये जाऊन तुमचं व्हॉट्सअॅप अप़डेट करावं लागेल. याआधी हे फीचर फक्त व्हॉट्सअॅपवर शेअर केलेल्या व्हिडिओसाठीच होतं पण आता फेसबूक, युट्यूब, इंस्टाग्रामवरील व्हिडिओसाठी देखील हे सपोर्ट करणार आहे. 

व्हॉट्सअॅपवर येणारे यूट्यूब, फेसबुक किंवा इंस्टाग्राम व्हिडिओच्या लिंकवर क्लिक केल्यावर आधी लिंक ओपन होत होती. पण आता त्या विंडोमध्येच व्हिडिओ प्ले होणार आहे. व्हॉट्सअॅप सध्या अशा नव्या नव्या फीचरवर काम करतं आहे.

Read More