Marathi News> टेक
Advertisement

Swift कारचा मोठा रेकॉर्ड

...

Swift कारचा मोठा रेकॉर्ड

नवी दिल्ली : मारुतीच्या नव्या स्विफ्ट गाडीने खूपच कमी वेळात प्रेक्षकांची मनं जिंकली. काही दिवसांपूर्वी रेकॉर्ड बुकिंगचा आकडा गाठल्यानंतर आता मारुती स्विफ्टने आता नवा रेकॉर्ड बनवला आहे. मारुती कंपनीने स्विफ्टचं नवं मॉडेल ग्रेटर नोएडात फेब्रुवारी २०१८मध्ये आयोजित ऑटो एक्सपोत लॉन्च केलं होतं.

लॉन्च झाल्यानंतर अवघ्या काही काळातच नव्या स्विफ्टने कारप्रेमींची मनं जिंकली. त्यामुळेच या कारने ५ महिन्यांपेक्षाही कमी काळात १ लाख कारची विक्री करत नवा रेकॉर्ड बनवला आहे.

१४५ दिवसांत बनवला रेकॉर्ड 

स्विफ्ट कारला विक्रीचा हा रेकॉर्ड गाठण्यासाठी अवघे १४५ दिवस (साडे चार महिने) कालावधी लागला. यापूर्वी पहिल्यांदा २००५ मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या स्विफ्टच्या देशभरात १.८९ मिलियन (जवळपास १९ लाख कार) कारची विक्री झाली होती. कंपनीने दावा केला आहे की लवकरच विक्रीचा आकडा २० लाखांचा पल्ला गाठेल. न्यू जनरेशनची स्विफ्ट आकर्षक डिझाईनमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे.

एप्रिलमध्ये सेल्स नंबर १

यापूर्वी एप्रिल २०१८ मध्ये मारुती कंपनीने स्विफ्टच्या २२,७७६ कारची विक्री करत विक्रीत अव्वल क्रमांक मिळवला होता. एप्रिल २०१७ मध्ये स्विफ्टने ऑल्टो कारला मागे टाकत विक्रीत अव्वल क्रमांक पटकावला होता.
मारुती सुजुकी स्विफ्टची १.२ लीटर पेट्रोल मॉडल नवी दिल्लीत ४.९९ लाख रुपये (एक्स शोरुम) उपलब्ध आहे. तर, याचचं बेस १.३ लीटर व्हेरिएंट दिल्लीत ५.९९ लाख रुपये (एक्स शोरुम) किंमतीत उपलब्ध आहे.

Read More