Marathi News> टेक
Advertisement

Netflix वर आता मोफत पाहता येणार चित्रपट, सीरीज

नेटफ्लिक्सने यासंदर्भात एक यादी जाहीर केली आहे.

Netflix वर आता मोफत पाहता येणार चित्रपट, सीरीज

नवी दिल्ली : ओटीटी प्लेटफॉर्म नेटफ्लिक्सवर Netflix मेंबरशिप नसल्यासही आता कंपनीकडून नेटफ्लिक्सचे काही शो आणि मूव्हीज प्रेक्षकांना मोफतमध्ये पाहता येणार आहेत. नेटफ्लिक्सने यासंदर्भात एक यादी जाहीर केली आहे, जी भारतासह संपूर्ण जगात विनामूल्य उपलब्ध होणार आहे.

यूजर्सला netflix.com/in/watch-freeवर, यादीतील विनामूल्य शो किंवा मूव्ही पाहता येणार आहे. Netflixने दिलेल्या माहितीनुसार, यूजर्स कंम्प्यूटर आणि अँन्ड्ऱॉईड डिव्हाईसचा उपयोग करुन Netflixच्या ओरिजनल मूव्हीज, टीव्ही शो ऑनलाईन पाहू शकतील. 

स्ट्रेंजर थिंग्स (Stranger Things), मर्डर मिस्ट्री (Murder Mystery), एलिट (Élite), बॉस बेबीः बॅक इन बिजनेस (Boss Baby: Back in Business), बर्ड बॉक्स (Bird Box), व्हेन दे सी अस (When They See Us), लव इज ब्लाइंड (Love Is Blind), द टू पोप्स (The Two Popes), अवर प्लेनेट (Our Planet) आणि ग्रीक अँड फ्रेन्की (Grace and Frankie) यांसारखे शो यूजर्सला फ्रीमध्ये पाहता येणार आहेत. 

ओटीटी कंपनीकडून ही ऑफर पहिल्यांदाच आली नसून, गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातही कंपनीने आपल्या काही ओरिजनल्सचे, पहिले एपिसोड भारतात विनामूल्य वापरण्याचा ऍक्सेस दिला होता. त्याशिवाय नेटफ्लिक्सकडून आपले काही शोज YouTubeवरही फ्रीमध्ये उपलब्ध केले जातात.

नेटफ्लिक्सने सांगितलं की, ते ओरिजनल सीरिज, मूव्हीज फ्रीमध्ये पाहण्याची ऑफर देत आहेत, जेणेकरुन यूजर्स नेटफ्लिक्सचा अनुभव घेतील आणि पुढे मेंबरशिप घ्यायची की नाही ते ठरवू शकतील. कंपनीने नुकताच भारतात एक स्वस्त 349 रुपयांचा सब्स्क्रिप्शन प्लान टेस्ट केला होता. यात यूजर्सला हाय डेफिनिशन व्हिडिओ परवडणाऱ्या किंमतीत ऑफर केला जाऊ शकतो. 

 

Read More