Marathi News> टेक
Advertisement

MG Air इलेक्ट्रिक कारचा लाँचिंगपूर्वीच बोलबाला, सिंगल चार्जवर कापणार 300 किमी अंतर

एमजी मोटर्स कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. MG Air EV ही गाडी 2023 Auto Expo सादर केली जाण्याची शक्यता आहे. नुकतंच या गाडीची एक झलक दिसून आली.

MG Air इलेक्ट्रिक कारचा लाँचिंगपूर्वीच बोलबाला, सिंगल चार्जवर कापणार 300 किमी अंतर

MG Air EV In G20 Summit: पेट्रोल डिझेल कारनंतर गेल्या काही वर्षात इलेक्ट्रिक कार रस्त्यावर धावताना दिसत आहे. इंधन दरवाढ आणि प्रदूषणाच्या दृष्टीकोनातून इलेक्ट्रिक कार परवडणाऱ्या आहेत. मात्र इलेक्ट्रिक कारच्या किंमती जरा जास्त असल्याने परवडणाऱ्या कार बाजारात येण्याची कारप्रेमी वाट पाहात आहेत. त्यामुळे छोट्या कार आल्या तर बरं होईल, अशी अनेकांची भावना आहे. खरं तर येणारा काळ मायक्रो इलेक्ट्रिक कारचा असणार आहे. मुंबईत बुधवारी इलेक्ट्रिक व्हेईकल ब्रँड PMV Electric नं स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच केली. या गाडीची किंमत 4.79 लाख रुपये आहे. विशेष म्हणजे अल्टोपेक्षा छोटी आहे. आता या गाडीनंतर एमजी मोटर्स कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. MG Air EV ही गाडी 2023 Auto Expo सादर केली जाण्याची शक्यता आहे. नुकतंच या गाडीची एक झलक दिसून आली. G20 शिखर परिषदेत सुमारे 300 MG Air EVs तैनात करण्यात आल्या आहेत. इंडोनेशियात ही गाडी Wuling Air EV म्हणून ओळखली जाते. कंपनीने अधिकृत व्हिडीओही शेअर केला आहे. शिखर संमेलनात वुलिंग एअर इव्हीच्या दोन वेगवेगळ्या डिझाईन्स सादर करण्यात आल्या आहेत. 

MG Motor ची ही इलेक्ट्रिक कार इंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या G20 समिटमध्ये अधिकृत कार म्हणून वापरली जात आहे. ही MG ची भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असू शकते. त्याची किंमत 10 लाखांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. या गाडीची लांबी 2,974 मिमी, रुंदी 1,505 मिमी आणि उंची 1,631 मिमी असू शकते. व्हीलबेस 2,010 मिमी असण्याची शक्यता आहे.

बातमी वाचा- Hyundai ची Venue N Line ही गाडी देणार अपघाताचा पुरावा! कसं ते जाणून घ्या

MG Air EV मध्ये दोन बॅटरी पॅक असतील. एक बॅटरी 17.3 kWh आणि दुसरी 26.7 kWh युनिटची असेल. कंपनीचा दावा आहे की छोटी बॅटरी 200 किमीपर्यंतची रेंज देते, तर मोठी बॅटरी 300 किमीपर्यंत चालते. दोन्ही बॅटरी पॅकमध्ये मागील एक्सलवर इलेक्ट्रिक मोटर मिळते जी 41 PS ची पॉवर जनरेट करते.

Read More