Marathi News> टेक
Advertisement

सीडीआर म्हणजे काय रे भाऊ?

सीडीआरची इतकी चर्चा सुरू असताना सीडीआर म्हणजे नेमकं काय, हे जाणून घेतलं पाहिजे.

सीडीआर म्हणजे काय रे भाऊ?

मुंबई :  सीडीआरची इतकी चर्चा सुरू असताना सीडीआर म्हणजे नेमकं काय, हे जाणून घेतलं पाहिजे. सीडीआरमध्ये कोणती माहिती असते, त्याबाबत नियम काय आहेत? आता मोबाईल ही चैन नसून गरज बनली आहे आणि व्यावसायिक किंवा व्यक्तिगत कामांसाठी मोबाईलचा सर्रार वापर करतो. पण आपण करत असलेला प्रत्येक फोन किंवा एसएमएस याची माहिती कुठेतरी साठवली जात असते. या माहितीला कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणजेच सीडीआर म्हणतात. 

सीडीआर हा खरंतर मेटाडेटा

सीडीआर हा खरंतर मेटाडेटा असतो. म्हणजे डेटाचा डेटा. सोप्या शब्दांत सांगायचं तर तुम्ही फोनवर कुणाशी बोललात, किती वेळ बोललात हे यातून समजू शकतं. पण काय बोललात हे समजत नाही. साधारणतः फोन कोणत्या क्रमांकावरून केला गेला आहे. कोणत्या क्रमांकावर केला आहे. कॉल सुरू होण्याची वेळ. कॉलचा एकूण कालावधी. 

कॉल केल्याचे प्रत्येक डिटेल्स

कॉलचं बिल कोणत्या क्रमांकावर जाणार आहे. कॉल कनेक्ट करणारं टेलिफोन एक्सचेंज किंवा इक्विपमेंटची माहिती. त्याचा युनिक सिक्वेन्स क्रमांक. कॉलदरम्यान अन्य क्रमांक डायल झाले असल्यास त्याची माहिती.

व्हॉईस कॉल होता की मेसेज होता

कॉल कट झाला असेल तर त्याबाबत तपशिल. कॉलचा प्रकार, म्हणजे व्हॉईस कॉल होता की मेसेज होता याची माहिती. यासारखी माहिती सीडीआरमध्ये साठवली जाते. या माहितीचा वापर प्रामुख्यानं टेलिफोन कंपन्यांना बिलं तयार करण्यासाठी होतो. पोलिस किंवा अन्य तपास यंत्रणांना एखाद्या गुन्ह्याबाबत माहिती यातून मिळू शकते. मात्र एखाद्या व्यक्तीचा सीडीआर मिळवण्यासाठी काही नियम आहेत आणि पोलिसांसह सर्वांनाच या नियमांचं पालन करावं लागतं. चोरीच्या मार्गानं सीडीआर मिळवून विकणं हा कायद्यानं गुन्हा आहे.

Read More