Marathi News> टेक
Advertisement

Maruti WagonR Vs Maruti Celerio या दोनपैकी कोणती गाडी सरस? माहिती वाचा आणि निवड करा

मारुती वॅगनआर आणि मारुती सेलेरियो या दोन गाड्यांपैकी एकाची निवड करताना कारप्रेमींमध्ये संभ्रम असतो. नेमकी कोणती गाडी खरेदी करावी? असा प्रश्न पडतो.

Maruti WagonR Vs Maruti Celerio या दोनपैकी कोणती गाडी सरस? माहिती वाचा आणि निवड करा

Maruti WagonR And Celerio Comparison: मारुती वॅगनआर आणि मारुती सेलेरियो या दोन गाड्यांपैकी एकाची निवड करताना कारप्रेमींमध्ये संभ्रम असतो. नेमकी कोणती गाडी खरेदी करावी? असा प्रश्न पडतो. यासाठी आज आम्ही तुम्हाला कारची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती देणार आहोत. जेणेकरून तुम्हाला योग्य कार निवडता येईल. वॅगनआरची किंमत सुमारे 5.5 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलसाठी सुमारे 7.20 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. त्याच वेळी, सेलेरियोची किंमत सुमारे 5.25 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलसाठी सुमारे 7 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.

मारुती वॅगन आर इंजिन, मायलेज आणि वैशिष्ट्ये

मारुती वॅगन आर 1.2 लिटर पेट्रोल आणि 1 लिटर पेट्रोल इंजिन या दोन इंजिन पर्यायांमध्ये येते. त्याच्या 1 लीटर पेट्रोल इंजिनमध्ये सीएनजीचा पर्याय देखील उपलब्ध आहे. ही गाडी 34.05km पर्यंत कमाल मायलेज देऊ शकतो. ही गाडी मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते. या कारमध्ये इडल स्टार्ट/स्टॉप फीचर उपलब्ध आहे. यात 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जी अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेला सपोर्ट करते. यात इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ORVM, ड्युअल फ्रंट एअरबॅग आणि मागे पार्किंग सेन्सर यांसारखी वैशिष्ट्ये देखील मिळतात.

मारुती सेलेरियो इंजिन, मायलेज आणि वैशिष्ट्ये

मारुती सेलेरियो 1.0-लीटर पेट्रोल इंजिनसह येते, जे 67 पीएस पॉवर आणि 89 एनएम टॉर्क जनरेट करू शकते. यात 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT मिळते. सेलेरियो सीएनजी मॉडेलमध्ये देखील येतो. ही गाडी सीएनजीवर 56.7PS/82Nm जनरेट करते. सीएनजीवर 35km पेक्षा जास्त मायलेज देऊ शकते. यात 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील मिळते, जी अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेला सपोर्ट करते. कारमध्ये इंजिन स्टार्ट/स्टॉप बटण, पॅसिव्ह कीलेस एंट्री, स्टीयरिंग व्हील माउंटेड ऑडिओ कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्ये देखील आहेत. याला वॅगन आर प्रमाणेच सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळते.

Read More