Marathi News> टेक
Advertisement

दमदार कामगिरीसह मारूती सुझुकीने बंद केले कारचे हे मॉडेल

अनेकांच्या स्वप्नांना आकार देणाऱ्या मारूती सुझूकीच्या स्विफ्ट कारबाबत काहीशी दुख:दायक बातमी आहे. मारूती सुझूकीने या कारचे मॉडेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या कारची शेवटची काही छायाचित्रे व्हायरल होत आहेत. ज्यात यूनिटमधील काही कर्मचारी असेंबल करत असताना कारसोबत फोटो काढताना दिसत आहेत.

दमदार कामगिरीसह मारूती सुझुकीने बंद केले कारचे हे मॉडेल

मुंबई : अनेकांच्या स्वप्नांना आकार देणाऱ्या मारूती सुझूकीच्या स्विफ्ट कारबाबत काहीशी दुख:दायक बातमी आहे. मारूती सुझूकीने या कारचे मॉडेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या कारची शेवटची काही छायाचित्रे व्हायरल होत आहेत. ज्यात यूनिटमधील काही कर्मचारी असेंबल करत असताना कारसोबत फोटो काढताना दिसत आहेत.

दरम्यान, कारच्या हूडवर लिहीण्यात आले आहे की, 'शेवटची स्विफ्ट - E07460'एका सुंदर प्रवासाची शेवटाकडे सुरूवात. नव्या सुरूवातीसाठी टीमकडून एक शानदार कार लवकरच. दिनांक - 23 डिसेंबर, 2017.

या फोटोच्या माध्यमातून संकेत मिळतो की, स्विफ्टचे आता नव्हे व्हर्जन येत आहे. त्यामुळे एका इतिहासाचे साक्षीदार ठरलेले कारचे हे मॉडेल बंद करण्याचा कंपनीचा विचार आहे. दरम्यान, सन 2018मध्ये मारुती सुझूकी कारचे आणखी एक नवे कोरे मॉडेल लॉन्च करत आहे. त्यामुळे मारूतीच्या शोकेसमध्ये हे मॉडेल आता इतिहासाची नोद दाखवत राहिल.

मारूतीच्या स्विफ्टचे वैशिष्ट्य असे की, 2005मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या या मॉडेलने अल्पावधीच जनमानसावर पकड घट्ट केली. या कारमध्ये 1.3 लीटरचे पेट्रोल इंजिन लावण्याता आले आहे. 2007मध्ये या कारचे फेसलिफ्ट मॉडेल आले. या मॉडेलमध्येही कंपनीने 1.3 लीटर डिझेल इंजिन दिले. 2010मध्ये कंपनीने कारचे पेट्रोल इंजिन रिप्लेस केले आणि त्या ऐवजी 1.2 लीटरचे सीरीज इंजिन दिले. 2011मध्ये मारूतीचे सेकंड जनरेशन स्विफ्ट हॅचबॉक मॉडेल मार्केटमध्ये आणले. ज्यात अनेक स्टायलीश फीचर होते. 2014मध्ये कारचे मिड लाईफ फेसलिफ्ट करण्यात आला. हा नवा बदल ग्राहकांना इतका आवडला की, हे मॉडेल आजही विक्रमी खपाचे आकडे नोंदवत आहे. 

दरम्यान, मारूती स्विफ्टचे थर्ड जनरेशन मॉडेल HEARTECT च्या धरतीवर बनले आहे. यात अनेक नवे स्टायलीश लूक देण्यात आले आहेत. कारमध्ये प्रोजेक्टर, हेडलॅम्प, स्पॉर्टी अलॉय व्हिल्स,  फ्लॅट बॉटम स्टेयरिंग आणि छानसे केबिन देण्यात आहे.

Read More